घरात शौचालय कोणत्या दिशेला असावे?


शौचालयाला इंग्रजीत 'टॉयलेट', उर्दूत 'पाखाना' आणि गुजराथीत 'जाजरु असे म्हणतात. प्राचीन काळी किंवा अगदी प्रास वर्षापूर्वीच्या काळातही शौचालय मुख्य घरात कधीही बांधत नसते, परंतु अलिकडे जागेअभावी शौचालय नाईलाजाने घरातच बांधावे लागते. 

वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातून यात काहीही गैर नाही, परंतु शौचालयाची घरातील दिशा मात्र योग्य असायला हवी. ती चुकीची असेल, तर त्या घरात राहणाऱ्या कुटुंबाला भीषण स्वरुपाच्या संकटांना तोंड द्यावे लागते.

वायव्य,पश्चिम, दक्षिण व नैऋत्य या शौचालय बांधण्या-च्या योग्य दिशा आहेत. शौचालय दक्षिणेला असेल, तर दक्षिण पश्चिम किंवा दक्षिण बाजूची भिंत प्रमाणापेक्षा जास्त जाडीची बांधू नये.

शौचालय नैऋत्य म्हणजे दक्षिण-पश्चिम दिशेला असेल, तर त्याची उंची नेहमीपेक्षा थोडी जास्त ठेवावी. शौचालयाचा वापर करताना व्यक्तीचे तोंड दक्षिण किंवा पश्चिम दिशेला होऊ नये. या दिशांना तोंड होणार नाही, हे लक्षात घेऊनच शौचालयाची रचना केली पाहिजे.

शौचालयातील नळ नैऋत्य, आग्नेय किंवा दक्षिण दिशेला असू नये. ईशान्य, पूर्व, उत्तर किंवा पश्चिम या नळासाठी योग्य दिशा आहेत.


फरशीचा उतार नेहमी दक्षिण दिशेला असावा. जागेच्या दक्षिण बाजूला घर असेल आणि घराचे मुख्य दार पूर्व बाजूला असेल, तर शौचालय आग्नेय दिशेला पूर्वेच्या भिंतीला लागून न बांधता, ते दक्षिणेच्या भिंतीला लागून बांधावे. 

घरात एकदम तोंडाशी किंवा घराच्या अगदी शेवटच्या कोपऱ्यात शौचालय कधीही बांधू नये.
शौचालय चुकीच्या ठिकाणी बांधले गेले, तर गुप्तांगांशी संबंधीत आजार होण्याची शक्यता वाढते. शिवाय, अनेक प्रकारच्या शुभ फलांना ते घर मुकते.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)