Skip to main content

Posts

devachi arthi

  देवीची आरती दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी। अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी ॥ वारी वारी जन्मामरणाते वारी । हारी पडलो आता संकट निवारी ॥ १ ॥ जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी । सुरवर ईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ ध्. ॥ त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसी नाही। चारी श्रमले परंतु न बोलवे कांहीं ॥ साही विवाद करिता पडिले प्रवाही । ते तु भक्तांलागी पावसी लवलाही ॥ जय. ॥ २ प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा। क्लेशापासूनी सोडी तोडी भव पाशा ॥ अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ॥ जय. ॥ गणपतीची आरती सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची । सर्वांगे सुंदर उटी शेंदूराची । कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥ १ ॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥ रत्नखचित बरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुम केशरा । हिरे जडित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नृपुरे चरणी घागरिया ॥ 2 ॥ लंबोदर पितांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना । दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना । जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥
Recent posts

Aarti sangrah (आरती संघ्रह )

मराठी  मधून मुलं वर सावंसकर व नीट आचरण साठी मराठी अस्मितेचे  लेखन  आरती अणे खूप  संस्कारधन हा ज्ञानाचा अमोल ठेवा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावा या भावनेतून हा ग्रंथप्रसाराचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना प्रेमभराने दिलेली ही भेट म्हणजे नित्यपठण व नित्यवाचनासाठी संग्रह आहे. विद्यार्थ्यांनी गुणसंपन्न व ज्ञानसंपन्न व्हावे हीच प्रेमळ अपेक्षा ! Pratighnya भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. मला अभिमान आहे. की माझ्या देशातल्या समृद्ध आणि की विविधतेने नटलेल्या परंपरांचा छाया त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव क प्रयत्न करीन... माझा देश आणि माझे देशबाधव व यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि समृद्धी ह्यातच माझे सौख्य सामावलेले आहे.् जगत् कल्याणासाठी प्रार्थना काले वर्षतु पर्जन्यः: पृथिवी सस्यशालिनी। देशोऽयं क्षोभरहितो, ब्राह्मणा: सन्तु निर्भया: ॥ अपुत्राः पुत्रिणः सन्तु, पुत्रिणः सन्तु पौत्रिणः । अधना : साधना सन्तु, जीवन्तु शरदः शतम् ।। सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया। सर्वे भद्र

अभंग वाणी

महाराष्ट्रामध्ये  अभंगवाणी हि खूप आहे कारण आपल्या मराठी भूमीला खूप सारे संत भेटलेले आहेत त्यांचे अभंग खालील प्रमाणे  अभंगवाणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, श्री नामदेव, श्री एकनाथ, श्री तुकाराम यांनी शेकडो अभंगांची रचना केली. या अभंगवाणीतून समाजमने घडविली. आजही या अभंगाचे शब्द अनेकांच्या ओठावर सहजतेने येतात. नित्यपाठ करण्यासाठी काही अभंगरचना या ठिकाणी दिल्या आहेत. संत तुकारामांचे अभंग  (१) सुंदर ते ध्यान उभे विटेवरी। कर कटावरी ठेवूनिया॥ तुलसीहार गळा कासे पीतांबर ।  आवडे निरंतर हेचि ध्यान॥ध्रु॥ मकरकुंडले तळपती श्रवणी। कंठी कौस्तुभमणी विराजित॥  तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख।  पाहीन श्रीमुख आवडीने॥ (२) जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले ।।स तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा ॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ॥। त्यासी आपंगिता नाही। त्यासी धरी जो हृदयी।। दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी।। तुका म्हणे सांगू किती। तोचि भगवंताची मूर्ति ।। (३) जरी झाला भाग्यवंत । तरी का भेटेल भगवंत॥ उंच वाढला एरंड। तरी का होईल इक्षुदंड।। जरी गर्दभ वेगी द्यावे। तरी का अश्वमोल पावे ॥ तुका म्हण

आपले सन १

सनातन हिंदू  मध्ये सणाचे  महत्व अणे कार्यप्रणाली  नमस्कार मित्रानो मागील पोस्ट मध्ये आपण दसरया पर्यंत च्या सर्व  माहिती आपण जाणून घेतली आता दिवाळीपासूनची माहिती  पुडे प्रमाणे  दिवाळी :  दीपोत्सव म्हणजे आनंदाचा उत्सव, उल्लासाचा उत्सव आणि प्रकाशाचा उत्सव होय. 'तमसो मा ज्योतिर्गमय । अंधारातून प्रकाशाकडे नेणारा समृद्धीबरोबर ऐक्य संवर्धन करणारा उत्सव म्हणजे दिवाळी. अश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया असा सहा दिवस चालणारा हा उत्सव असून वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, श्री लक्ष्मी पूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज या दिवसांचे संमेलन म्हणजे दिवाळी होय. दिवे लावण्याचा हा सण म्हणून दिवाळी म्हणतात. या दिवसात प्रत्येक घराच्या दारात आकाशकंदील लावला जातो.  १. वसुबारस  : दिवाळीचा सण धनत्रयोदशीपासून प्रारंभ होत असला तरी अश्विन वद्य द्वादशी पासून या सणाचा खरा प्रारंभ होतो. वसुबारस, गोवत्स द्वादशी किंवा गौबारस असेही या दिवसाला म्हटले जाते. इंद्र पाऊस पाडतो म्हणून इंद्राची पूजा केली पाहिजे अशी गोकुळातील लोकांची श्रद्धा होती. परंतु 'गोवर्धन पर्वतामुळे पाऊस पडतो, आपण त्याची पूजा केली पाहिजे.

आपले सन (aple festival)

आपले सण  ची माहिती व त्यांना लागणारी  सर्व  पद्धती  आपल्या देशाला सांस्कृतिक इतिहास आणि वारसा लाभलेला आहे. म्हणूनच उत्सव आणि सण साजरे करतांना आनंद-उल्हासांचे दर्शन घडते. उत्सवाचे सर्वानाच आकर्षण असते तसेच उत्सव बालगोपालांपासून थोरा-मोठ्यापर्यंत सर्वांना प्रिय असतात. उत्सव आपल्याला का आवडतात? या प्रश्नाचे उत्तर उत्सव या शब्दातच सामावलेले आहे. उत्सव म्हटला की उत्साह आनंद, जल्लोष यांचे दृश्य नजरेसमोर येते. रोजच्या जीवनातील कंटाळवाण्या कार्यात उत्सवाचे रंग भरल्यावर नवीन चैतन्य निर्माण होते. जीवन जगण्यातील आनंद म्हणजे उत्सव आणि दुःख, वेदना विसरून उत्सव साजरे करणे होय. आपल्या सण आणि उत्सवाविषयी माहिती समजून घेतल्यास. प्रत्येक सण-उत्सवामागे संस्काराचे नाते असल्याचे ध्यानात येईल. • गुढीपाडवा : चैत्र शुद्ध प्रतिपदा किंवा वर्षप्रतिपदा हा दिवस गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो. वर्षातील साडेतीन मुहुर्तापैकी गुढीपाडवा एक मुहूर्त आहे. शालिवाहन शकाची सुरवात ह्याच दिवसापासून होते. शालिवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य तयार केले. त्यावर पाणी शिंपडले व त्याला सजीव केले. आणि त्याच्या मदतीने प