घर बांधण्यास चांगली जागा कोणती?


घर बांधण्यास पाहत असलेली जागा चांगली आहे की नाही, हे ओळखण्यासाठी वास्तुशास्त्राने एक सोपा उपाय सांगितला आहे. त्या जागेच्या मधोमध एक फूट खोल खड्डा खणावा व त्यात पूर्ण पाणी भरावे. 

चोवीस तासानंतर त्यातील पाण्याची स्थिती पाहावी. खड्यात पाणी जसेच्या तसे असेल किंवा थोडेसेच कमी झालेले असेलतर अशी जागा घर बांधण्यासाठी सर्वोत्कष्ठ समजली जाते

खड्यातील पाणी जमिनीत अर्धे मुरले असेल व अर्धे राहिले असेल तर अशी जागा घरासाठी बरी समजली जाते. पण खड्ड्यातील पाणी जमिनीत पूर्ण मुरले असेल किंवा पाण्यामुळे जंमिनीला चिर पडल्या असतील तर, अशी जागा वास्तू बांधण्यासाठी अशुभ समजली जाते. 

तेथे घर बांधून राहणे धोक्याचे व नुकसानदायी ठरुशकते. मालकाचे अनेक प्रकारचे नुकसान होऊन मानसिक व
शारीरीक हानीही होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी अशुभ ठरलेली जमीन घेणे कटाक्षाने टाळावे. 

घरात वावरताना नव्या घरात प्रवेश करताना घराची वास्तुशांती केलीच पाहिजे. वास्तुशांती स्वत:च्या हस्ते होणे जास्त महत्वाचे.
प्लॉटचा आकार काटकोन चौकोन असणे लाभदायक ज्यावेळी प्लॉट खरेदी केला जातो, त्यावेळी त्याचा आकार पाहणे आवश्यक असते. 

प्लॉटचा आकार चौरस असणे सर्वात महत्वाचे असते, त्यातही काटकोन चौकोन असेल, तर उत्तम असते. प्लॉटचा आकार त्रिकोणी असेल, तर मात्र कोर्ट-कचेरीच्या फंदात गुंतवून बसावे लागते. प्लॉट ईशान्य कोनात कमी असेल, तर मात्र उत्तम असते आणि संमृद्धीच्या दृष्टीने लाभदायक समजले जाते.

प्लॉटचा आकार हा जर नैऋत्य कोनात ९० अंशापेक्षा कमी असेल, तर मात्र राक्षसी अनुभव येतो. आग्नेय कोन ९० कमी असेल, तर वाईट चिंता संभवते. वर्तुळासारखा प्लॉट मालकाला अस्थिरता देणारा असतो, तर पंचकोनाकृती प्लॉट हा तसा चांगला नसतो. 

काही तरी दुःखाचे अनुभव येतात. काटकोनी प्लॉट उत्तमच असतो. सुख, सम्पन्नता देणारा असून मन:शांती प्रदान करतो. समलंब चौकोन, व्याघ्रमुखी असे प्लॉट खूप कष्ट देणारे असतात. गोमुखी प्लॉट हा मध्यमच समजावा. काही काळ उत्तम जातो. प्लॉट निवडताना वरीलप्रमाणे विचार आवश्यक आहे.

आणि रेकीचा जवळचा सबंध

वास्तुशास्त्र आणि रेकीचा काही सबंध आहे काय असा विचार केला असता असे म्हणावे लागते की, आपले वास्तुशास्त्र पंचमहाभूतांवरती आधारित आहे. वैश्विक ऊर्जा मिळविण्याच्या घराची अंतर्गत योजना शक्यतो वास्तुशास्त्रानुसार निसर्गात जी आदिशक्ती आहे तिलाच आपण रेकी म्हणतो. 

रेकीच्या वापरामुळे मनुष्य आपली शारीरीक, मानसिक व अध्यात्मिक पातळीवर उन्नती करु शकतो. चक्राचा समतोल राखण्याचे काम महत्वाचे मानले गेलेले आहे. ही चक्रे म्हणजे काय असा विचार करता, ही चक्रे म्हणजे वातावरणातून प्राणशक्ती ग्रहण करुन शरीर पोहचवणारी ऊर्जेची द्वारे म्हणजेच चक्रे होत. योग शास्त्रानुसार सात चक्रे आहेत, त्यांचा शरीर अवयव व ग्रंथीशी सबंध आहे.

अविरत ऊर्जेचा प्रवाह हा शरीराच्या प्रत्येक पेशींमधून वाहण्यासाठी व त्यांचा योग्य समन्वय राखण्यासाठी चक्राचे कार्य योग्य चालणे महत्वाचे असते. सध्याच्या शारीरीक, मानसिक ताणतणावाच्या जीवनामुळे चक्राचे कार्य बिघडते ते पूर्वपदी आणण्यासाठी रेकीचा उपयोग होतो.

वेध घरासाठी अशुभ असतात

बृहत्संहितेनुसार जर घरासमोर रस्ता, झाड, इतर घराचा कोपरा, खांब, मोरी अशुभ मानले जाते, परंतु जर घराच्या दाराच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर जर हे वेध असतील तर यांचा कसलाही दोष नसतो. वास्तुशास्त्रानुसार पुढील वेध सांगितले आहेत.

 हारवेध : घराच्या प्रवेशद्वारासमोर जर एखादा वृक्ष, पाण्याची टाकी, विहीर, हॅण्डपंप वगैरे नसावे. घराच्या दारासमोर वा मधल्या चौकात शिडी नसावी. घराच्या दारासमोर पाळीव प्राण्यांना बांधण्यासाठी खुंटी नसावी.

भार्गवे (रस्ता) :
 याला विधीशूळही म्हणतात. समोरून येणारा रस्ता जर सरळ आपल्या घरात येत असेल तर तो सर्वदृष्टीने अशुभ असतो. त्याचप्रमाणे चोहोबाजूंनी येणारे रस्ते जर आपल्या दारासमोर येत असतील अशुभ असते. तसेच कोण- त्याही दिशेने येणारा रस्ता घरासमोर संपत असेल तर

जागी घर बांधू नये. त्याचप्रमाणे घरात प्रवेश करण्यासाठी अत्यधिक वेडा वाकडा रस्ता असेल तर घर शुभ नाही.

छिद्रवेध वास्तुनियमानुसार घराच्या मागील भागाकडे कसलेली छिद्र वगैरे नसावे. यामुळे सतत चोरांची भीती असते. घरातील वस्तू पाहता येतात. घरावर आसुरी वृत्तीचा प्रभाव वाढतो.

चित्रवेध घरात क्रूर हिंस्त्र पशु-पक्षी तसेच भयानक चित्र टांगू नयेत किंवा लावू नयेत.

समवेध जर एका मजल्यापेक्षा दुसऱ्या मजल्याची उंची आकार समान नसेल तर त्याला समवेध म्हणतात. अशा घरात राहणाऱ्या व्यक्तींना सुखसमाधान लाभत नाही.

गर्भवेध मुख्य प्रवेशद्वाराच्या मधोमध भिंत नसावी. गर्भवेध म्हणतात. गर्भवेधामुळे त्या घरात सतत त्रासदायक वातावरण राहते आणि लक्ष्मी टिकत नाही.

ध्वजवेध : 
घरावर कोणत्याही मंदिरावरील ध्वजाची सावली पडत असल्यास त्याला ध्वजवेध म्हणतात. यामुळे त्या घरातील माणसे आजारी पडतात, जर मंदीर घराच्या प्रवेशद्वारापासून बाजूला असेल तर ध्वजदोष होत नाही तसेच मंदीर आणि घरामधून रहदारीचा रस्ता असेल किंवा मंदिर घराच्या/दाराच्या उंची पेक्षा दुप्पट अंतरावर असेल तर तो दोष होत नाही.

इतर वेध : घरासमोर धोबीघाट किंवा लोहार कामाचे ठिकाण, कुंभारकामाची जागा, पिठाची गिरणी, स्मशानभूमी नसावी.

कोणत्या दिशेस काय असावे?

प्राचीन भारतीय वास्तुशास्त्र दिशांना अनन्यसाधारण महत्व आहे. घराच्या दारांची, खिडक्यांची दिशा, त्याचप्रमाणे घराच्या आतील भागात विविध उपयोगाच्या वस्तू, उपकरणे कोणत्या विशिष्ट दिशेला असली पाहिजेत, याचे मार्गदर्शन वास्तुशास्त्र मिळते. या मार्गदर्शनाप्रमाणे घरातील किंवा दुकानातील वस्तूंची मांडणी केल्यास सौख्य लाभते.

आग्नेय दिशा : सर्वात प्रथम दक्षिण व पूर्व दिशांमधील आग्नेय दिशा संबंधी पाहू या. आग्नेय दिशेच कधीही पाणी अथवा कोणत्याही प्रकारचा पाण्याचा साठा असू नये. हा नियम जरा काटेकोरपणे पाळावा. बन्या ठिकाणी आग्नेय दिशेच पाण्याचा साठा आढळता. (वास्तुमध्ये, वास्तूच्या बाजूला) अशा वास्तुमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना अनेक

संकटांना तोंड देताना पाहिले आहे. लोहार, सोनार वेल्डिंग, थोडक्यात अग्नीशी संबंधित असलेल्या धंदेवाल्यांनी आग्नेय दिशेस दरवाजा करुन धंद्यात वृद्धी करावी.


घरातील रचना

आग्नेय दिशेस स्विचबोर्ड मीटर, बटणे असावीत. आग्नेय दिशेस फ्रीज ठेवाव. (फ्रिज थंड ऊर्जा निर्माण करतो हे लक्षात ठेवा.) म्हणूनच आग्नेय फ्रीजची व्यवस्था केल्यास फायदा होईल.

स्वयंपाक घरात आग्नेय दिशेस शेगडी, स्टोव्ह, चलू स्वयंपाकाचा ओटा पूर्व-उत्तर दिशा मध्ये एल आकाराप्रमाणे वास्तुपूजनाच्या वेळी लागणाऱ्या वस्तू चांदीचा नाग, तार, वास्तुप्रतिमा, मोती, आग्नेय दिशेसच वास्तूतच (घरामध्ये) पुराव्या, पुरताना चांदीचा नाग वास्तुप्रतिमेचे तोंड पूर्वेला करुन, एका नवीन लहान बोळक्यात (मातीच्या) घालून, वरती शेवाळे टाकून, झाकण लावून पुरावे दहीभाताचा नैवद्य दाखवावा. सणासुदीच्या दिवशी, लक्ष्मीपूजन, वटपौर्णिमा अशा दिवशी या

जागेवर पणती लावावी. पुरलेल्या जागेवर फरशी लावून बंद करावे. अशा ठिकाणावर जड सामान ठेवू नये. कारखानदारांनी आपल्या कारखान्याच्या आग्नेय दिशेस बॉयलर, जनरेटर, इलेक्ट्रिक उपकरणे ठेवावीत. 

ज्या कारखान्यात अथवा घरांत नोकरांविषयी समस्या निर्माण होतात, अशा वेळेला वास्तूच्या आग्नेय दिशेस कामगार रुम, चेंजिंग रुम, वॉचमन रुम जरुर तयार करावी. 

याचप्रमाणे घरातील आग्नेय दिशेची खोली नोकराला द्यावी. बऱ्याचशा समस्या सुटू लागतील. नोकर टिकण्यास मदत होईल. आग्नेय दिशेस पाण्याचा साठा, डबकी, ओढा, नाला असल्यास त्वरीत बंद करावा.

अनेक डबघाईला आलेल्या उद्योगधंद्याच्या आग्नेय दिशेला पाण्याचा साठा पाहावयास मिळाला. आग्नेय दिशा नव्वद अंशापेक्षा कमी असलेली वास्तू शक्यते विचार करुन घ्यावी.

पश्चिम दिशा:
ही दिशा इतर देशांच्या मानाने जड असावी. स्वयंपाकघरात पश्चिम दिशेस भांडी, मिक्सर इत्यादी सामान ठेवावे. बंगल्यातील पश्चिम दिशेस जेवण्याची रुम करावी पण जेवतांना तोंड उत्तर-पूर्व असावे. वास्तूच्या पश्चिमेस पिंपळ असेल त्यांना चांगला फायदा होतो. पश्चिमेस बाग-बगिचा करण्यास हरकत नाही.

नैऋत्य दिशा:
तसे पाहता ही दिशा राक्षसी प्रवृत्तीची दिशा मानण्यात आली आहे. नैऋत्य दिशेचे बांधकाम करतेवेळी जास्तीत जास्त काळजी द्यावी. या दिशेस अपघाताचे प्रमाण जास्त असते. बांधकामात अनेक अडचणी निर्माण होतात.
खोलीत नैऋत्य दिशेस जड सामान ठेवावे. 

मिक्सर, भांडी नैऋत्य दिशेस ठेवावी.बंगल्यातील अथवा ब्लॉकमधील नैऋत्येकडील खोली भाडयाने अथवा नोकरास देऊ नये.

वास्तुमालकास त्रास होऊ लागतो. सतत मनस्ताप घडतो.नैऋत्य खोलीतील वस्तू लवकर बाहेर येत नाहीत. बंगल्यातील सामान, कुदळ, फावडे इ. वस्तू ठेवण्यासाठी नैऋत्य दिशा निवडावी. ही दिशा जेवढी जड करु तेवढी फायदेशीर ठरते. 

चुकूनही आजारी माणसास नैऋत्य खोलीत अथवा नैऋत्य दिशेस झोपवू नये. प्रकृतीत आराम पडण्यात अडचणी निर्माण होतील. स्वास्थ्य चांगले राहणार नाही. आजारी माणसाच्या नैऋत्य खोलीत अथवा नैऋत्य दिशेस झोपवू नये. प्रकृतीत आराम पडण्यात अडचणी निर्माण होतील. 

स्वास्थ्य चांगले राहणार नाही. आजारी माणसाच्या तक्रारीचे प्रमाण वाढते राहील. याचप्रमाणे इतर व्यक्तींनासुद्धा या दिशेस, खोलीत झोपण्याचे टाळावे. नैऋत्य खोलीत अथवा बाजूस पूजा अच्छा, धार्मिक विधी करु नये.

थोडक्यात खालील गोष्टी जमेल तेवढया कराव्यात.

१) आग्नेय : लोहार, सोनार, वेल्डिंग, अग्नीशी सबंध असलेल्या धंदेवाल्यांनी आग्नेय दिशेस दरवाचा करुन जरुर फायदा करुन घ्यावा. जेवण        तयार करण्यास आग्नेय दिशा निवडावी. फ्रीज आग्नेय दिशेस ठेवावा. मिक्सर, स्विचबोर्ड आग्नेय दिशेस ठेवावा.

२) पूर्व : स्नानगृह, पाण्याचा साठा ईशान्य उत्तर दिशेस असावा. तर पूर्व दिशेस अभ्यासास तोंड करुन बसावे. होम यज्ञ पूर्वेस तोंउ करुन  करावा.

३) ईशान्य : देवघर, पाणी, अभ्यासाची दिशा, औषधे जरुर ठेवणे. उंचीने लहान तीन फुटापर्यंत असलेल्या झाडांचा बगिचा करावा.

४) उत्तर दिशा : ही दिशा कुबेराची मानली गेली आहे. पैसा अडका ठेवणे, अभ्यासाला तोंड करुन बसणे,   याचप्रमाणे ही दिशा शक्यतो  रिकामी ठेवावी. जड समान-सुमान ठेवू नये.
५) वायव्य दिशा : सामानासाठी स्वयंपाकघरात लागणाऱ्या कच्च्या मालासाठी जागा करावी. कोठार असल्यास उत्तम.

६) पश्चिम दिशा : स्वयंपाकघरात भांडी, सामान ठेवणे, देशा नेहमी जड करावी. जेवणाची खोली पश्चिमेस असावी. पंपळ वास्तूच्या पश्चिमेला असल्यास फायदेशीर.

७) नैऋत्य दिशा : स्वयंपाकघरात ही जागा रिकामी ठेवू नये. जड समान ठेवावे. महत्वाचे निर्णय या जागेवर घेऊ नये. येथे मिक्सर, भांडी हे  सामान जरुर ठेवावे.

८) दक्षिण दिशा : दक्षिण दिशेस झोपण्याची खोली असावी. परंतु दक्षिण दिशेस पाय करुन झोपू नये. अवजड सामान ठेवावे. बगिचा, त्याचप्रमाणे मोठी झाडे लावावीत 

पूर्व दिशा :
पूर्व दिशा शक्यतो रिकामी ठेवावी. तीन फुटापेक्षा उंच न वाढणारी झाडे लावावी. पूर्वला दरवाजा चांगला समजला जातो. बाथरुम पूर्वेला असावे म्हणजे, स्नानाच्या वेळी तोंड पूर्वेला होऊन सूर्यकिरणांचा लाभ मिळतो. पाण्याचा साठा पूर्वेला चालू शकतो. आपल्या घरात वापरात येणारे पाणी पूर्वेकडून आल्यास उत्तम. होमहवन, पूजा-अर्चा पूर्वेकडे तोंड करुन करावी. अभ्यासाची खोली पूर्वेस असल्यास चालेल.

ईशान्य दिशा:
वास्तुशास्त्र ईशान्य दिशेस महत्व प्राप्त झाले आहे. ईशान्य दिशा म्हणजे पूर्व व उत्तर दिशांमधील दिशा होय. ईशान्य दिशेला देवाची प्रतिमा, देव्हारा, फोटो ठेवून जर पूजा-अर्चा केल्यास प्रचीती येते, या विधानाबद्दल वास्तुशास्त्राला मानणाऱ्याचे एकमत आहे. त्यांना अ देवपूजेस, साधनेत, नामजप, नामस्मरण अशा क्षेत्रात यशप्राप्ती होत नसेल, त्यांनी ईशान्य दिशेस देव्हाऱ्याची स्थापना करुन प्रगती साधावी, या विधानाचा जरुर अनुभव घ्यावा. 

आजारी माणसांन स आपली औषधे ईशान्य दिशेस ठेवावी. ईशान्य दिशेस पाण्याच ये साठा असणे म्हणजे फारच चांगले मानले गेले आहे. ज्यांना विहीर बोअरींग काढावयाचे असल्यास ईशान्य दिशेचा जरुर फायदा घ्यावा.

स्लोप पूर्व-ईशान्य दिशेला असावा. विद्यार्थ्यांनी ईशान्य दिशेल तोंड करुन अभ्यास करावा. अभ्यासात चांगली प्रगती जाणव लागेल. लेखक, पत्रकार किंवा लिखाण करणाऱ्यांनी या दिशेचे जरुर अनुभव घ्यावा, नोकरीसाठी अर्ज करणे, मुलीला लग्नासाठी दाखविणे, महत्वाच्या बैठका ईशान्य दिशेस ठेवल्यास कमी श्रमात यशप्राप्ती मिळते. आपल्या राहत्या वास्तूपासून नवीन घ्यावयार्च वास्तुशास्त्र जागा ईशान्य दिशेस असल्यास जरुर खरेदी नक्कीच उत्कर्ष जाणवेल.

उत्तर दिशा:
वास्तुशास्त्र ही दिशा कुबेराची दिशा समजली जाते. सांगितले आहे. परंतु काही व्यक्तींचा बाबतीत वेगळे अनुभव आहेत. उत्तरेस गल्ल्याचे तोंड असताना जेवढा चालत नव्हता तेवढा आज चालतो. आज टेबलाचे तोंड पश्चिमेस आहे. मुद्दाम इथे नमूद करत आहे.. जर शास्त्र वापरात असेल, तरच अशा उणिवा लक्षात येतील. उत्तरेला तोंड करुन अभ्यास करणे योग्यच समजले जाते. घरातील उतार उत्तरेस असल्यास आर्थिक सुबत्ता येते. उत्तर दिशा शक्यतो जड करु नये.

वायव्य दिशा:
दिशेला तिजोरी, कपाट, गल्ला, पैसा अडका असे शास्त्रात या दिशेस धन-धान्य साठवावे. वास्तूच्या वायव्येस धान्याचे कोठार करावे. वर्षाचे लागणारे धान्य अथवा लवकर वापरात येणारे धान्य ठेवावे. कोठारातील ईशान्य दिशेस देवघर करु नये. महत्वाच्या गोष्टींची चर्चा वायव्येकडील कोठारात अथवा वायव्य दिशेस करु नये. निर्णय घेण्यास वेळ लागेल. कोठारात रिकाती पोती, डबे, खोके, असू नयेत. स्वयंपाकघरात वायव्य दिशेस धान्य ठेवण्याची व्यवस्था करावी.

वास्तूबद्दल काही महत्वाच्या बाबी

आपल्या वास्तूच्या दारासमोरील असणाऱ्या गोष्टींमुळे जीवनावर होणार परिणाम

१) घराच्या दारासमोर जर झाड असेल तर मुलांना त्रास, सत्ता व धनदान्य निघून जाते, रोगराई होण्याचा संभव.

२) रस्त्याचे एक टोक दारासमोर जर संपत असेल तर मालकाला प्राणघातक, गुलामीचे जीवन, आजारपण, सर्वगोष्टी हिरावून जाणे असे अनर्थ घडतात.

३) दारासमोर चिखल किंवा गटार असेल तर सर्व गोष्टी हिरावून घेतल्या जातात.

४) दारासमोरील वाहते पाणी असल्यास अचानक, अधिक, वायफळ खर्च होतो.

५) दारासमोर देऊळ असेल तर घरात धनधान्याची कमी, घरातील मालकांना त्रास व मुलांना त्रास आढळतो.

६) दारासमोर पिलर असेल तर मालकाला त्रास, गोष्टीला वाव मिळतो.वाईट

७) घराच्या दारासमोर पोस्ट ऑफिस असेल तर अचानक आग उद्भवते.

८) दुसऱ्या घराचा कोपरा आपल्या दारासमोर असेर तर मृत्यु, भिती, डोक्यावर परिणाम होताना दिसतो.

९) दारासमोर मोठा खड्डा असेल तर समोरच्याला भांडणाचे कारण मिळते 

ज्या व्यक्तींना स्वत:च्या प्लॉटवरती घर बांधायचे असेल त्यांनी कोणत्या महिन्यात बांधकाम सुरुकरावे त्याबद्दल माहिती.

१) चैत्र महिना : हया महिन्यात जर घर बांधायला सुरुवात केली तर घरात अनेक प्रकारचे आजार उद्भवतात.

२) वैशाख महिना : हया महिन्यात घर बांधायला सुरुवात केली तर घरामध्ये धन-धान्य, पशु-पक्षी हयामध्ये वाढ होते.

३) ज्येष्ठ महिना : हया महिन्यात घर बांधायला सुरुवात केली तर घरातील वाढ खुंटते व मृत्युसुद्धा येतात.

४) आषाढ महिना : हया महिन्यात जर घर बांधायला सुरुवात केली तर घरात संपत्ती वाढते व नौकर चाकर, पशु- पक्षी हयांची वाढ होते.

५) श्रावण महिना : हया महिन्यात घर बांधायला सुरुवात केली तर घरामध्ये धन-धान्य, संपत्ती व शांतता मिळते.

६) भाद्रपद महिना : हया महिन्यात घर बांधायला सुरुवात केली तर घरात नेहमी नुकसान होते.

७) अश्विन महिना: हया महिन्यात जर घर बांधाय सुरुवात केली तर पत्नीसुख नाहीसे होते.

८) कार्तिक महिना : हया महिन्यात घर बांधायला सुरुवा केली तर घरात शांतता, धन-धान्य, आरोग्य चांगले राहते.

९) मार्गशीर्ष महिना : हया महिन्यात घर बांधायला सुरुवात केली तर घरात खाण्या-पिण्याची कधीही कमतरता होत नाही.
१०) पौष महिना : हया महिन्यात घर बांधायला सुरुवात केली तर घरात चोऱ्यामाऱ्या जास्त होतात.

११) मघा महिना : हया महिन्यात घर बांधायला सुरुवात केली तर घरात भरभराट होते व घरात आग सुद्धा लागते.

१२) फाल्गुन महिना : हया महिन्यात घर बांधायला सुरुवात केली तर घरात सुखसमृद्धी वाढते व अनेक दिशांनी उन्नती होते.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)