दुकान किंवा कार्यालयास कशी जागा लाभदायी?

दुकान किंवा कार्यालयास कशी जागा लाभदायी?

दुकान किंवा कार्यालयाची जागा कशी असली म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक ठरेल, यासबंधी वास्तुशास्त्राने निश्चित स्वरुपाचे मार्गदर्शन केले आहे. यासबंधातील मुख्य मार्गदर्शक तत्वे

१) दुकान किंवा कार्यालयाच्या इमारतीचा आकार तोंडाला अरुंद व मागील भाग रुंद असेल तर, अशी इमारत व्यवसायाच्या दृष्टीने अशुभ समजली जाते.

२) सिंहमुखी दुकान वा कार्यालय व्यवसायाच्या दृष्टीने शुभ होय. या प्रकारच्या इमारतीची लांबी जास्त असते. त्रिकोणी आकाराचे दुकान मात्र अत्यंत अशुभ समजले जाते. 

३) दुकानासमोर लगेच लागून वेडयावाकडया किंवा नागमोडी आकाराचे कोणतेही बांधकाम, शोभेची रचना करु नये. कारण त्यामुळे संबंधित दुकानदाराची, कार्यालय चालकाची मनःस्थिती बिघडते. व्यवसायात मन लागत नाही. 

४) दुकान किंवा कार्यालयात प्रवेश करताना आतल्या दारात चालण्याचा वेग कमी करणारा कोणताही अडथळा असू नये. अडथळा अगदीच दूर करता येत नसेल तर त्यामुळे जमिनीस जास्त चढ वा उतार प्राप्त होणार नाही, याची काळची घ्यायला हवी. 

५) दुकान, कार्यालय किंवा हॉटेल बाहेरील अंगण नेहमी स्वच्छ, अडथळाविरहीत व उत्साहवर्धक वातावरण निर्माण करणारे असावे. फरशी खडबडीत किंवा जास्त उतार असलेली नसावी.

६) दुकान किंवा कार्यालयाचा ईशान्य कोन नेहमी रिकामा ठेवला पाहिजे. ही जागा व्यवस्थित झाडलेली व पुसून घेतलेली असावी.

७) देवघर, पुजेचे ठिकाण नेहमी ईशान्य कोनात म्हणजे उत्तर-पूर्व दिशेच्यामध्ये असावे.

८) दुकानात तराजू पश्चिम किंवा दक्षिण दिशेला लागून असलेल्या भिंतीच्या स्टॅडला अडकवून ठेवावेत.

९) दुकानात पायऱ्या किंवा जिना तयार करायचा असेल तर ईशान्य कोन वगळून अन्य कोणत्याही दिशेला करावी. दुकानातील मालाचा  स्टॉक दक्षिण, नैऋत्य किंव पश्चिम दिशेला ठेवावा.

११) विजेचा मीटर, जनरेटर किंवा स्वीच बोर्ड इ. विद्युत यंत्रणा दुकानाच्या आग्नेय कोनात ठेवाव्यात.

१२) दुकानात कपाट, शोकेस, फर्निचर इ. वस्तू दक्षिण पश्चिम दिशेच्या मध्यभागात ठेवाव्यात. उत्तर-पूर्व हा भाग ग्राहकांन रिकामा ठेवायला हवा. वा कार्यालयाचा दरवाजा कोणत्या दिशेस असणे 

दुकान वा कार्यालयाचा दरवाजा कोणत्या दिशेस शुभ?

1 उत्तर-पूर्व दिशेस - अतिशुभ

2 उत्तर दिशेस - बऱ्यापैकी चांगले शुभ

3 पूर्व दिशेस - शुभ

4 मध्यम शुभ - उत्तर-पश्चिम दिशेस

5 पश्चिम दिशेस - साधारण शुभ

6 दक्षिण-पूर्व दिशेस - ना नफा ना तोटा

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)