घराची अभ्यासाची खोली कोणत्या दिशेस असावी? आणि शयनगृहरचना व दांपत्य सौख्य (वास्तु सौख्य)



घराची अभ्यासाची खोली कोणत्या दिशेस असावी?

मुलांच्या खोलीत त्यांच्या अभ्यासाच्या साधनांची पूर्ण व्यवस्था करायला हवी. ही स्टडी रुम चांगली ऐसपैस व शांत वातावरण असावी. अभ्यासाच्या खोलीसबंधी वास्तुशास्त्राने घालून

दिलेली मार्गदर्शक तत्वे खालीलप्रमाणे आहेत. 

१) मुलांची अभ्यासाची खोली उत्तर किंवा पूर्व दिशेला बांधणे अतिशुभ फलदायी ठरते. त्यामुळे, विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळते.

२) अभ्यास करताना मुलांचे तोंड उत्तर-पूर्व दिशेला हो अशाप्रकारे त्यांची बसण्याची व्यवस्था केली पाहिजे. 

३) अभ्यासाच्या खोलीचा रंग सौम्य रंगछटेचा, पडद्यांचा 2ै फिकट हिरवा, फिकट आकाशी किंवा फिकट बदामी (क्रीम कलर यांपैकी एक निवडावा.

४) पडद्यांचा रंग गर्द गुलाबी, फिकट राखाडी, पिवळा किंवा मा फिकट तपकिरी असला तरी चालतो.

५) अभ्यासाच्या खोलीत फुले, फुलांचे फोटो किंवा चि्रे महापुरुषांचे फोटो लावल्यानेही अभ्यासास उत्साहवर्धक व प्रेरणादायी वातावरण         निर्माण होते.

६) मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत स्वच्छ रुमाल व टॉवेलही ठेवावेत.

शयनगृहरचना व दांपत्य सौख्य (वास्तु सौख्य)


पती पत्नी मधील संवाद टाळण्यासाठी आणि सुसंवाद सुधारण्यासाठी स्थूलमानाने पुढील उपाय शयनगृहात व एकंदर घरामध्ये करुन पहावेत.

१) काटेरी झाडे (गुलाब सोडून) कॅक्टस् इत्यादि घराच्या परिसरात ठेवू नयेत.

२) चित्रविचित्र आकाराच्या वस्तू तसेच धारदार वस्तू शयनगृहात व घरातही प्रदर्शनीय स्वरुपात नको.

३) घरात कुठुनही ओल येऊ देऊ नका.

४) घरात (विशेषत; शयनगृहात) कोणतेही रंग भडक स्वरुपातले टाळावेत.

५) मुख्यद्वार तसेच अन्य कोणतेही दार तसेच पंखा इत्यादीचा होणारा करकर आवाज त्वरीत तेलपाणी घालून बंद करावा.

६) घरातल्या भांडयांचे धक्का लागून होणारे आवाज तसेच कंप त्वरीत बंद करावेत.

७) स्वयंपाक घरातील चूल (शेगडी) व पाण्याचा साठा यात शक्य तितके जास्त अंतर ठेवावे.

८) घर हे मंदिर आहे आणि यामध्ये अनेक देवदेवतांचा शुभ ऊर्जा प्रवाह यांचा) वास असतो. हे गृहीत धरुन मोठमोठयाने बोलणे, वाद, भांढणे  शक्यतो टाळावेत. कर्कश्य आवाज संगीत हे टाळावे.

९) घरात योग्य तेवढा नैसर्गिक उजेड व हवा व तीही पूर्व उत्तरेकडून येणे हिताचे असते.

१०) पाण्याचा मोठा साठा, फिशटॅक शयनगृहात नसावा.

११) घरात कोणत्याही प्रकारची अडगळ ठेऊ नका. शक्य लवकर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावीत जा.

१२) शयनगृहात पलंगाचे सरळ प्रतिबिंब पडते असा आरसा नको.

१३) शयनगृहात गुलाबी किंवा सौम्य पिवळा रंग ठीक. तोही ऑइलपेंट नको.

१४) तुळईखाली झोपू नये.

१५) दोघांचा प्रयत्न व हास्यमुद्रितला फोटो एकाच फ्रेममध्ये शयनगृहात लावावा.

१६) त्रिकोणी आकाराचे फोटो वज्ज्य 

१७) दक्षिणेकडे डोके करुन झोपावे. दोघांसाठी एकच पलंग व एकच गादी (डबलबेड) आसावी. त्या दोन-दोन नसाव्यात.

१८) अन्य वस्तू उदा. मंटेरिअनडक, प्रेमपक्षी इत्यादी वस्त मात्र जोडीनेच असाव्यात.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)