आपले सन १



सनातन हिंदू  मध्ये सणाचे  महत्व अणे कार्यप्रणाली 

नमस्कार मित्रानो मागील पोस्ट मध्ये आपण दसरया पर्यंत च्या सर्व  माहिती आपण जाणून घेतली आता दिवाळीपासूनची माहिती  पुडे प्रमाणे 

दिवाळी : दीपोत्सव म्हणजे आनंदाचा उत्सव, उल्लासाचा उत्सव

आणि प्रकाशाचा उत्सव होय. 'तमसो मा ज्योतिर्गमय । अंधारातून प्रकाशाकडे नेणारा समृद्धीबरोबर ऐक्य संवर्धन करणारा उत्सव म्हणजे दिवाळी. अश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया असा सहा दिवस चालणारा हा उत्सव असून वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, श्री लक्ष्मी पूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज या दिवसांचे संमेलन म्हणजे दिवाळी होय. दिवे लावण्याचा हा सण म्हणून दिवाळी म्हणतात. या दिवसात प्रत्येक घराच्या दारात आकाशकंदील लावला जातो. 

१. वसुबारस : दिवाळीचा सण धनत्रयोदशीपासून प्रारंभ होत असला तरी अश्विन वद्य द्वादशी पासून या सणाचा खरा प्रारंभ होतो. वसुबारस, गोवत्स द्वादशी किंवा गौबारस असेही या दिवसाला म्हटले जाते. इंद्र पाऊस पाडतो म्हणून इंद्राची पूजा केली पाहिजे अशी गोकुळातील लोकांची श्रद्धा होती. परंतु 'गोवर्धन पर्वतामुळे पाऊस पडतो, आपण त्याची पूजा केली पाहिजे.' असे श्रीकुष्णाने गोकुळातील लोकांना

सांगितले. गोकुळातील लोकांनी गोवर्धनाची पूजा केल्यामुळे इंद्राने चिडून जाऊन वृंदावन आणि गोकुळावर मुसळधार पावसाचा वर्षाव केला. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन उचलून धरून त्याखाली गोकुळवासीयांचे रक्षण केले. तो दिवस म्हणजे वसूबारस' होय.

२. धनत्रयोदशी: धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस होय. भारतीय संस्कृतीमध्ये लक्ष्मीला आई समजून पूजनीय मानली आहे. वैदिक ऋषीनी तर लक्ष्मी उद्देशून गाईलेले आहे.

तन्नो लक्ष्मी : प्रचोदयात ॥ (महालक्ष्मीला मी जाणतो. (ज्या) विष्णुपत्नीचे ध्यान करतो त्या लक्ष्मीने आमच्या मन बुद्धीला प्रेरणा द्यावी) लक्ष्मी चंचल आहे असे सांगितले जाते. परंतु लक्ष्मी चंचल नसून लक्ष्मीवानाची वृती चंचल असते. लक्ष्मीमुळे मानव देव होऊ शकतो तसेच दानवी वृती देखील निर्माण होऊ शकते. विपरित मार्गाने वापरली जाते ती अलक्ष्मी होय. म्हणून उदारतेने चांगल्या कार्यासाठी लक्ष्मीचा वापर व्हावा यादृष्टीने लक्ष्मीपूजन करावे ही या सणामागील प्रथा-परंपरा आहे.

३. नरकचतुर्दशी : नरकचर्तुदशीला कालीचतुर्दशी देखील म्हणतात. नरकचतुर्दशी कथा अशी आहे - प्रागज्योतिषपुराचा राजा नरकासुर शक्तीमुळे सैतान बनला होता. स्वत:च्या शक्तीमुळे तो सर्वांना त्रास देत होता. इतकेच नव्हे तर स्त्रियांना सतावित होता. त्याने स्वत:च्या जनानखान्यात सोळा हजार कन्यांना कैद करून ठेवले होते. भगवान श्रीकृष्णाने त्याचा नाश करायचा विचार केला. तसेच सत्यभामा नरकासुराचा वध करण्याचा निर्धार केला. भगवान श्रीकृष्ण या कामी मदतीला धावले. चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचा नाश झाला. नरकासुराच्या जाचातून मुक्त झालेल्या लोकांनी विजयोत्सव साजरा केला. आसुरी प्रवृतीचा नाश आणि सत्तप्रवृतीची स्थापना अशी आठवण करून देणारा हा दिवस असून सूर्योदयापूर्वी स्नान करील त्याला नरकवास होणार नाही अशीही यादिवसाची प्रथा आहे.

४. लक्ष्मीपूजन : अमावस्येच्या अंधारात संपत्तीच्या ऐश्वर्याची पूजा करण्याची आमची प्रथा परंपरा आहे तसेच भारतीय संस्कृतीने जणू हा विचार रूढ केला आहे. लक्ष्मीप्राप्तीने उन्मत न होता विनम्र व्हावे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते. भगवान श्रीविष्णूने कश्यप व अदिती यांच्या उदरी बटु वामनाच्या' रूपात जन्म घेऊन बळीच्या यज्ञामध्ये जाऊन तीन पावले जमीन दान मागितले. भगवान वामनाने विशाल रूप धारण करून एक पावलामध्ये धरती, दुसऱ्या ब्रहमांड व तिसरा पाय बळीच्या डोक्यावर

ठेऊन त्याला पाताळात घातले. बळीच्या बंदिखान्यात बंदिस्त असलेल्या लक्ष्मी व कुबेर यांना मुक्त केले. हा सण या घटनेची आठवण म्हणून साजरा केला जातो. ५. बलिप्रतिपदा: नवीन वर्षाचा आरंभ अर्थात बलिप्रतिपदा असून वैदिक विचारांची स्मृती जतन करण्याचा हा दिवस. बलीचा वामनाने केलेला पराभव आसुरी वृती नष्ट करणे तसेच नैतिकतेचा आदर्श निर्माण करणे हा विचार सांगतो.

६. भाऊबीज : कार्तिक शुद्ध द्वितीया हा दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला आणि प्रेमाला साद घालणारा हा सण आहे. यादिवशी 'यम आपली बहिण यमी हिच्या घरी जेवावयास आला तेव्हा यमीने त्याला स्नान घालून ओवाळले ही आठवण जागवतांना आजही प्रत्येक भाऊ बहिणीच्या घरी जातो. बहिण त्याला ओवाळते. जेऊ घालते. लाडक्या बंधुरायासाठी मंगलाची प्रार्थना ईश्वराकडे करते. भाऊ-बहिण प्रेम जिव्हाला व्यक्त करणारा हा दिवस म्हणजे दिवाळीच्या सणातील महत्त्वाचा दिवस होय. दिवाळी सण म्हणजे अज्ञान, अंधश्रद्धा मोह यापासून मुक्त होऊन

नवीन प्रकाश देणारा दीपोत्सव आहे. अंत:करणात प्रेम आणि वात्सल्याचा दीप प्रज्वलीत घेऊन ज्ञानरूपी प्रकाशाने सर्व जीवन उजळून निघावे. जीवनात आनंद, सुख, मांगल्याचा अविष्कार घडावा. गीता जयंती : सुमारे पाच हजार वर्षापूर्वी मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या

मंगलप्रभाती कुरूक्षेत्राच्या रणभूमीवर योगेश्वर श्रीकृष्णाच्या मुखातून

गीता ज्ञान प्रवाह लाभला. हा दिवस म्हणजे समस्त मानवीसमाजाला

जीवनतत्त्वज्ञान सांगणारा गीताग्रंथ निर्माण झाला त्याची आठवण करून

देणारा अर्थात गीता जयंती. गई गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या वाणीतून निघालेले अमृत होय. या उपदेशाने रणभूमीवर अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत केले. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. असं सांगणारी गीता कर्म करीत रहा फळाची अपेक्षा धरू नकोस' असा निष्काम कर्मयोगाचा विचार सांगते. जीवन हा संग्राम असून क्षणोक्षणी येणाऱ्या प्रसंगाला रडण्यापेक्षा हसत हसत सामोरं जाऊन प्रसंगावर मात करावी. हिंमतीने आणि साहसाने तोंड द्यावे हे गीता सांगते.

दत्त जयंती : भगवान दत्तात्रेय हे अत्रि ऋषि व महासती अनसूया ह्यांचे पुत्र. 'अत्रि' म्हणजे त्रिगुणातील आणि 'अनसूया' म्हणजे असूयारहित. सत्व. रज व तम या तीन गुणात जो स्वेच्छेने खेळवू शकतो, या तीन गुणांची ज्याला बाधा झाला नाही ते अत्री. अन म्हणजे अणुभरही असूया नाही ती अनसूया. यांच्या उदरी भगवान श्रीविष्णुचा अवतार श्रीदत्तमहाराज अवतरले.

उत्पती स्थिती आणि लय यांचे स्वरूप ह्यांचे असलेले ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचे एकत्रीकरण दत्तप्रभू मध्ये पहावयास मिळते. दत्तमहाराज हे विश्वगुरू असून त्यांचे प्रत्येक युगात अनेक शिष्य झाले. श्री दत्ताच्या जवळ चार वेद चार श्वानांच्या रूपात असून सर्व मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू त्यांच्या जवळ आहे.

• मकर संक्रांत : 'तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणून सर्वांना एकत्र आणणारा मकर सक्रांत हा सण पौष महिन्यात येतो. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून हा उत्सवाला मकर सक्रांत म्हणतात. सूर्य सहजतेने उतरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला उत्तरायण म्हणतात. या दिवसांपासून आधार हळूहळू कमी होत जातो.
संक्रांतीने शंकासुर व किंक्रांतीने दुसऱ्या दिवशी किंकरासुर या दोघांचा वध केल्यामुळे हा सण साजरा केला जातो अशी पुराणकथा आहे. या उत्सवानिमित स्नेह्यांकडे जायचे, तिळगुळ देऊन मतभेद आणि भांडणे बाजूला ठेवायचे असतात. एकमेकांशी प्रेमाने वागायचे. प्रेम वाढविणारा हा सण आहे. जीवनात नितांत प्रेम हवे असे सुचविणारा सण आहे मकर संक्रांत

होळी पौर्णिमा : फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होलिकोत्सव साजरा करण्यास येतो. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी, फाल्गुन वद्य प्रतिपदेला धूलीवंदन व फाल्गुन वद्य पंचमीला रंगपंचमी असे म्हणतात. असा पाच दिवस चालणारा हा सण वर्षभर झालेल्या कामाचा ताण नाहीसा करून नूतन वर्षांचे स्वागत करण्यास उत्साह निर्माण करण्याचे कार्य करतो. उत्सवकाळात थोडा स्वैरपणा असतो तो मनावरील दडपण दूर करून आनंद मिळावा यासाठी असतो. या सणाला शिमगा' असेही म्हणतात. भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपू ची बहिण होलिकेला बोलाविले. सतप्रवृतीच्या माणसाला त्रास दिला नाही तर अग्नी तिला जाळणार नाही असे तिला वरदान होते. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला होलिका सह चितेवर बसवून ती पेटविली. त्यात होलिका भस्म झाली. प्रल्हाद मात्र सुरक्षित राहिला. प्रल्हाद सुरक्षित राहिल्याचा आनंद म्हणजे सत्प्रवृतीचा विजय आणि होलिका भस्म झाली म्हणजे दुष्ट प्रवृतीचा नाश याची आठवण या उत्सवानिमित्त जागविली जाते. होलिकेचे स्मरण

म्हणजे अग्नीदिव्याचे स्मरण होय. होलिका पूजन म्हणजे असत्प्रवृत्तीच्या नाशासाठी तसेच

सतप्रवृतीच्या रक्षणासाठी लोकांच्या हृदयात असलेल्या शुभ भावनांचे प्रतिक आहे. म्हणून हा उत्सव आनंद, उल्लासाने साजरा करतात. धूलीवंदन' अर्थात धुळवड ही समाजातील लहान, थोर गरीब-श्रीमंत यांना एकत्र येऊन जीवनाचा आनंद घेण्यास सुचवते. होळीमध्ये कचरा, निकामी वस्तु याबरोबर भोगवादी तसेच त्रासदायक खोटे विचार जाळून चांगल्या विचारांची स्थापना करावी ही या सणामागील भावना आहे. यादिवशी पुरणपोळी करून आनंद साजरा केला जातो.

आपल्या संस्कृतीची समृद्ध परंपरा जोपासणारे हे सर्वच सण आणि उत्सव त्या त्या सणांच्या पौराणिक कथांची आठवण करून देतात. मनामध्ये सद्प्रवृत्ती, भक्ती, प्रेम, माणुसकी, सत्शीलता निर्माण करतात. वाईट प्रवृतीला तिलांजली देऊन चांगल्या प्रवृतींची मुहुर्तमेढ करावी असेही या सणांमधून सुचविले जाते. रोजच्या जीवनात अनेक दु:ख व्यथा, अडचणींना सामोर जाऊन जगावे लागते. या सर्व अडचणी क्षणभर का होईना दूर ठेवून एकसंध होऊन सणानिमित्त आनंद साजरा करावा. तसेच सण-उत्सवानिमित तयार करण्यात येणारे खाद्यपदार्थ ऋतुमानानुसार अनुरूप असल्याने शरीराला पोषक ठरतात.

सणांमागील घटना व प्रसंग समजून घेऊन आनंद साजरा करणारी वृती अंगीकरणे म्हणजे मन समृद्ध करणे होय. तसेच योग्य आहार खाद्यपदार्थाच्या आस्वाद घेऊन शरीर समर्थ करणे होय. संस्कृती संवर्धनाचे कार्य सण साजरे करण्याद्वारे होते.


0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)