आपले सन 2 (aple festival)



आपले सण  ची माहिती व त्यांना लागणारी  सर्व  पद्धती 

आपल्या देशाला सांस्कृतिक इतिहास आणि वारसा लाभलेला आहे. म्हणूनच उत्सव आणि सण साजरे करतांना आनंद-उल्हासांचे दर्शन घडते. उत्सवाचे सर्वानाच आकर्षण असते तसेच उत्सव बालगोपालांपासून


थोरा-मोठ्यापर्यंत सर्वांना प्रिय असतात. उत्सव आपल्याला का आवडतात? या प्रश्नाचे उत्तर उत्सव या शब्दातच सामावलेले आहे. उत्सव म्हटला की उत्साह आनंद, जल्लोष यांचे दृश्य नजरेसमोर येते. रोजच्या जीवनातील कंटाळवाण्या कार्यात उत्सवाचे रंग भरल्यावर नवीन चैतन्य निर्माण होते. जीवन जगण्यातील आनंद म्हणजे उत्सव आणि दुःख, वेदना विसरून उत्सव साजरे करणे होय. आपल्या सण आणि उत्सवाविषयी माहिती समजून घेतल्यास.

प्रत्येक सण-उत्सवामागे संस्काराचे नाते असल्याचे ध्यानात येईल.

गुढीपाडवा : चैत्र शुद्ध प्रतिपदा किंवा वर्षप्रतिपदा हा दिवस गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो. वर्षातील साडेतीन मुहुर्तापैकी गुढीपाडवा एक मुहूर्त आहे. शालिवाहन शकाची सुरवात ह्याच दिवसापासून होते. शालिवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य तयार केले. त्यावर पाणी शिंपडले व त्याला सजीव केले. आणि त्याच्या मदतीने प्रभावी शत्रूचा पराभव केला. या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शक सुरू झाला.

ह्याच दिवशी श्रीरामचंद्रांनी वालीच्या जुलुमातून दक्षिणेकडील प्रजेची सोडवणूक केली. वालीच्या त्रासातून मुक्त झालेल्या प्रजेने घरोघर उत्सव साजरा करून गुढ्या (ध्वज) उभारीत असलेली गुढी विजयाचा संदेश देते. घरातून वालीचा, आसुरी संपतीचा, रामायण दैवी संपतीने नाश केला असे सुचविणारा गुढीपाडवा मांगल्य आणि पावित्र्याचे प्रतिक आहे. वर्षारंभाचा हा दिवस शुभसंकल्प दिवस म्हटला पाहिजे. गुढी अर्थात

विजय ध्वज व शुभसंकल्प दिवस म्हटला पाहिजे. गुढी अर्थात विजय ध्वज हा संकल्पातून सिद्धीपर्यंत वाटचाल करण्यास प्रवृत करणारा म्हण विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळवण्याचा संकल्प असो वा उद्योग व्यापर - व्यवसाय यातील घटकांनी व्यवसाय वाढविण्याचा संकल्प असो हे सारे चांगले संकल्प यादिवशी करून यशासाठी वाटचाल करण्याचे ठरविले जाते.

श्रीरामनवमी : राम व कृष्ण हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत. प्रत्येक भारतीयाच्या अंत:करणात या दैवताविषयी श्रध्दाभाव वसलेला आहे. 'श्रीराम जयराम जय जय राम आणि 'गोपाल कृष्ण, राधेकृष्ण' याचा जयघोष हे या श्रद्धेचे प्रतिक आहे. रामकृष्णहरी हा वारकरी संप्रदायातील मंत्रोच्चार सर्वांना परिचित आहे.

आपल्या जीवनात राम पूर्णपणे एकरूप झाला आहे. रामनाम केवळ नामःस्मरणातुरते नसून परस्परांना भेटल्यावर नमस्कार करतांना हात जोडून 'राम राम' म्हणण्याची प्रथा आहे.

मर्यादा पुरुषोत्तम राम हा जीवनाचा आदर्श म्हणून आपल्याला सातत्याने सांगितला जातो. रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला दुपारी बारा वाजता झाला. जीव व जग जेव्हा आधि, व्याधि व उपाधी यांनी तप्त होतात, तेव्हा त्यांना शान्ती व सुख देण्यासाठी प्रेम, पावित्र्य व प्रसन्नतेचा पुंज प्रभु राम जन्म घेतो. रामजन्मोत्सव उत्साहाने साजरा करताना रामासारखे व्यक्तिमत्त्व व्हावे अशी तीव्र इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होते. कौटुंबिक, सामाजिक राजकीय, नैतिक मर्यादेत राहून पुरूष उत्तम कोऊ शकतो हे मर्यादा पुरुषोत्तम राम के जीवन आपणाला समजावते. रामाने रामाने देवता निर्माण केले आहे.

राम आणि रावण ही सतप्रवृती आणि दुष्टप्रवृती यांच प्रतिक असून रामाचा विजय म्हणजे सतप्रवृतीचा विजय आणि रावणाचा पराभव म्हणजे दृष्टप्रवृतीचे निदलिन होय.

राम हा सात्विक आहे तसाच प्रेमळ आहे. आईवडिलांच्या ठायी त्याची नि:सीम भक्ती आहे. रामाचे भावांवर विलक्षण प्रेम आहे. राम प्रजाहितदक्ष राजा म्हणून प्रजेच्या मताचा आदर करणारा कर्तव्यरक्ष राजा आहे. सुसंपन्न, सुव्यवस्थित रामराज्य असा उल्लेख केला जातो. रामनवमीच्या दिवशी रामाची भक्ती भावाने केलेली पूजा आदर्शाची पूजा आहे.

श्री हनुमान जयंती : विश्वातील सप्तचिरंजीव मध्ये ज्याचा उल्लेख केला जातो अशा श्रीराम-भक्त हनुमंताचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला झाला. श्रीरामाच्या देवालयाची पूर्तता हुनमंताशिवाय होऊ शकत नाही. म्हणून श्रीराम मंदिर समोर हनुमंताची मूर्ती असते. हनुमान हा भक्तीचे प्रतीक आहे तसेच शक्तीचे रूप आहे. शौर्य, धैर्य सामर्थ्य, बुद्धी, गती, वीरता, नम्रता, ब्रह्मचर्य, सेवाभाव, रक्षक, विवेक,

विचार या गोष्टी हनुमानामध्ये एकत्रित झाल्या आहेत. रावण व कुंभकर्ण
प्रवृतींचा नि:पात करण्यासाठी रामसेवक हनुमानाची गरज आहे. रामाच्या
संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या दास मारूतीची प्रार्थना हनुमान जयंतीच्या
दिवशी निष्ठेने केली जाते.

अक्षय्य तृतीया: अक्षय्य तृतीया, पितृ, देव शुभ तिथी, वसंतोत्सव या विविध नावांनी अक्षय्य तृतीया याचा उल्लेख केला जातो. या तिथिला केलेले चांगले कर्म व दिलेले दान अक्षय टिकते. भगवान श्रीकृष्णाने अक्षय्य तृतीयेचे व्रत युधिष्ठिराला सांगितले होते. साडेतीन मुहुर्तातला एक मुहूर्त असल्याने विशेषतः नवीन व्यवसाय, उद्योगाला या दिवशी सुरवात करतात.

वटसावित्री : भगीरथाने अत्यंत परिश्रम करून जिद्दीने स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणली. आणि सावित्रीने तशाच जिद्दीने आणि चिकाटीने यमाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले.

संकटप्रसंगी न डगमगणारी, गरिबीत घरच्या माणसाप्रमाणे गरीब होऊन सुखासमाधानात राहणारी, मृत्युशी झुंज देणारी सावित्री जगावेगळी नव्हती. सर्वसाधारण मुलीसारख्या सावित्रीने स्वत:च्या कर्तृत्वाने हे गुण आत्मसात केलेत.

ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला या कर्तृत्वसंपन्न सावित्रीची आठवण करतांना स्त्रिया वट सावित्री व्रत करतात. जन्मोजन्मी हाच पती लाभावा ही शुभभावना बाळगतांना पतीनिष्ठा, पतीप्रेम आणि सांसारिक बंधनांना जणू आपल्याभोवती बांधून घेतात. भारतीय संस्कृतीचा पाया कुटुंबसंस्था असून पती-पत्नी हा जीवनाचा आधार आहे. परस्परांना समजून घेऊन सांसारिक जीवन सुखी व्हावे हीच अपेक्षा वटसावित्री व्रताची व्यक्त झाली आहे.

आषाढी एकादशी : श्रीपांडुरंगाच्या अर्थात श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढ शुद्ध एकादशीला लाखो लोक पंढरपूरला येतात. यादिवशी भव्य यात्रा भरते. विशेष म्हणजे आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी करून पंढरपूर येथे पोहोचलेले वारकरी मोठ्या संख्येने असतात. भगवान श्री पांडुरंग पुंडलिकाला भेटण्यासाठी पंढरपूरला आले. पुंडलिका भेटी परब्रह्म आले गां! चरणी वाहे भीमा उद्धरी जगा !!" असे आषाढी एकादशीचे महत्त्व आहे.
कुंभ दैत्याचा मुलगा मृदुमान्य याने स्वर्गाची सत्ता बळकावल्यावर सर्व देव त्रिकुट पर्वतातील गुहेत लपून बसले. मृदुमान्य देवांचा पाठलाग करीत तेथे आला गुहेच्या दारात थांबला. घाबरलेल्या देवांना उपवास घडला व त्यांच्या श्वासातून एक दिव्य स्त्री निर्माण झाली. देवांनी त्या देवीचे नाव एकादशी ठेवले. एकादशीचा जन्म झाला. तिने मृदमान्याचा वध केला तो दिवस आषाढ शुद्ध ॥ ११ अर्थात् एकादशीचा होता.

गुरूपौर्णिमा : आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे व्यासपूजेचा दिवस. व्यासपूजेच्या या पवित्र दिवशी संस्कृती घडविण्याचे काम वेगवेगळ्या रीतींनी अनेक ऋषींनी केले आहे. पण वेदण्यासांनी सर्व विचारांचे संकलन करून आपल्याला संस्कृतीचा ज्ञानकोष महाभारत' ग्रंथ दिला. त्यांच्या या ग्रंथाला पाचव्या वेदांची उपमा प्राप्त झाली आहे.

व्यास हे समाजाचे खरे गुरू होते. म्हणूनच परंपरागत व्यासपूजा ही गुरूपूजा मानली गेली व व्यास पौर्णिमा ही गुरूपौर्णिमा म्हणून साजरी होऊ लागली. मानवाला देव बनण्यासाठी पशुतुल्य वृत्ती वर संयम ठेवून वर्तन करावे लागते. ही संयमाची प्रेरणा त्याला गुरूच्या जीवनातून मिळत असते. माणसातील माणुसकी संवर्धन करण्यासाठी देखील गुरूचे मार्गदर्शन उपयोगी ठरते. अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश गुरूकडून प्राप्त होतो. गुरूपौर्णिमा निमित्ताने गुरूपूजन हे गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच गुरूबद्दल श्रद्धा, आदर आणि ऋण व्यक्त करण्यासाठी आहे.

लघु अवस्थेतून गुरू अवस्थेकडे नेतो तो गुरू आणि लघु व गुरू या दोन्ही अवस्थेतून विश्वव्यापी प्रभूचा साक्षात्कार घडवितो तो सद्गुरू होय. आपल्या जीवनात समृद्धी निर्माण व्हावी असे वाटणाऱ्यांनी सद्गुरूंना रण जावे. साक्षात् परमेश्वराला सुद्धा सद्गुरूंची गरज वाटली म्हणून भगवान
रामांनी वसिष्ठांची व प्रभू श्रीकृष्णाने संदिपनींची सेवा केली म्हणून

गुरु गीता सांगते 'गुरू: ब्रह्मा गुरू विष्णू गुरू देवो महेश्वरः । गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवैनमः ॥

गुरूपौर्णिमा सद्गुरूचे पूजन करावे विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवित असतांना ज्ञान देणारे शिक्षक अर्थात गुरू यांना वंदन करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे गुरूपौर्णिमेचा विचार आचरणात आणणे होय. ज्ञानार्जन करतांना गुरु विषयी आदरभाव बाळगणे विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे.

नागपंचमी : भारतीय संस्कृती मानवावर तसेच प्राणीमात्रांवर प्रेम करा त्यांच्याविषयी कृतज्ञताभाव बाळगा असे शिकविणारी श्रेष्ठ संस्कृती आहे. म्हणूनच पशुपक्षांचीही पूजा करण्याची परंपरा आपण जोपासतो. दूध देणाऱ्या गाईसाठी वसूबारस, शेतीचे काम करणाऱ्या बैलासाठी पोळा', मधुर संगीत गाणाऱ्या कोकिळेसाठी कोकिळाव्रत आचरण करून त्यांच्याविषयी त्रण व्यक्त करतो.

शेतीचे उंदरापासून रक्षण करणाऱ्या नागासाठी नागपंचमी सणाद्वारे उत्साहाने कृतज्ञता व्यक्त केली जाते. भगवान श्रीविष्णुच्या तमोगुणातून नागाची निर्मिती झाली. नागाचे

मानवजातीवर अनंत उपकार आहेत. भारतीयांचे आराध्य दैवत भगवान श्रीविष्णुला क्षीरसागरात बसण्यासाठी स्वत:च्या अंगाचे आसन करणारा शेषशाई नाग, विष प्राशन केल्यावर अंगाचा दाह नाहीसा व्हावा म्हणून आपल्या थंड शरीराचे वेटोळे घालून भगवान श्रीशंकरास आनंद देणारा नाग, देवा सुरांच्या समुद्रमंथन मध्ये त्यांना मदत करणारी 'वासुकी' भगवान श्रीरामचंद्राला सोबत करणारा 'लक्ष्मण व भगवान श्रीकृष्ण रागावून प्रेम देणारा बलराम हे शेषाचे अवतार होते. अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंवल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक व कालिया या नऊ नावाने प्रसिद्ध असलेला नाग तसा निरूपद्रवी सरपटणारा प्राणी आहे. सापाचे वर्णन वेदापासून पुराणापर्यंत आहे. महाभारत काळात नाग नावाची


जात होती त्यांचा आर्य लोकांशी संघर्ष होत असे. अशी कथा आहे गोकुळातील यमुनेच्या डोहात राहणाऱ्या कालियाच्या विषामुळे अनेक गाई, गोप मेल्याने भगवान श्री गोपालकृष्णाने कालियाला शिक्षा करून यमुनेतून हाकलून दिले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. या घटनेची आठवण नागपंचमीच्या निमिताने केली जाते. नागपंचमीच्या दिवशीगारूड्याने आणलेल्या नागाची पूजा करतात. तसेच घरात भिंतीवर किंवा कागदावर नागनागिणीचे चित्र काढून पूजा केली जाते. महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात बत्तीसशिराळे येथे नागदेवतेची मोठी यात्रा भरते.

राखी पौर्णिमा : यादिवशी बहीण भावाच्या उजव्या हातात राखी बांधून भावाने आपले रक्षण करावे अशी सद्भावना व्यक्त करते. रक्षाबंधन म्हणजे प्रेम बंधन आहे, भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा अविस्कार आहे. स्वार्थ आणि व्यवहाराने भरलेल्या जनजीवनात नि:स्वार्थ, निरपेक्ष आणि निर्मळ प्रेम जोपासणारा रक्षाबंधन हा भारतीय संस्कृतीतील संस्कार आहे. भावाकडून बहिणीचे रक्षण हे केवळ व्यक्तिगत पातळीवर मर्यादित न रहाता समस्त भगिनीवर्गाचे रक्षण आणि बंधू-भगिनी या नात्याला पावित्र्य-मांगत्याने बांधून घेणारा रक्षाबंधनाचा विचार महत्त्वाचा आहे. रक्षाबंधानाचा सण अनादी कालापासून चालत आला आहे. असुरांबरोबर युद्ध करतांना आत्मविश्वास गमावलेल्या इंद्राला इंद्राणिने श्रावण पौर्णिमेला राखी बांधली त्यामुळे आत्मविश्वास येऊन असुरांचा पराभव केला. या घटनेची मंगल आठवण म्हणून रक्षाबंधन सण साजरा केला जातो. कौरव पांडवांच्या युद्धामध्ये चक्रव्यूह भेदण्यासाठी जेव्हा अभिमन्यू निघाला तेव्हा कुंतीने त्याला राखी बांधली असा महाभारतात निर्देश आढळतो. तर स्वत:च्या रक्षणासाठी राणी कर्मवतीने हुमायुनाला राखी पाठविली होती. अशा रीतीने राखी मध्ये रक्षण ही संकल्पना दडलेली आहे.

रक्षाबंधानाच्या दिवशी श्रावण पौर्णिमा असते. यादिवशी सागराची पूजा केली जाते. अक्षय्य तृतीयेला उचंबळणारा सागर श्रावण पौर्णिमेला

शांत होतो. अशी कोळ्यांची श्रद्धा आहे. यादिवशी सागरपूजन करून श्रीफळ अर्पण करतात.

• श्री गणेशोत्सव : भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्रीगणेशाचा जन्म झाल्यामुळे या उत्सवाचे आयोजन घराघरातून केले जाते. 'सुखकर्ता दुखहर्ता श्री गणेश चतुर्थी व्रताने प्रसन्न होतो अशी श्रद्धा आहे. शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी, वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्टी आणि जर चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी या नावाने ओळखतात.

श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश पूजा केली जाते. गणपती बाप्पा मोरया असा श्रीगणेशाचा जयजयकार केला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात जनजागृतीसाठी एकत्र येण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. इ. स. १८९३ साली लोकमान्यांच्या या विचारातून गणेशोत्सव सार्वजनिकरितीने साजरा होऊ . लागला. तोपर्यंत गणपती घराबाहेर पडला नव्हता.

श्री गणेशाच्या अनेक जन्मकथा आहेत. त्यातील एक कथा अशी की, एकदा पार्वतीने आपल्या मळापासून एक मूल तयार केले व त्याला दारात बसून सांगितले की 'मी स्नान करीत आहे. तू कोणालाही आत सोडू नकोस. पार्वती स्नानाला गेल्यावर भगवान शंकर आले. तेव्हा दारात बसलेला मुलगा त्यांना आत जाऊ देईना. भगवान शंकरांनी रागाच्या भरात त्या मुलाचे शिर धडविगळे केले. त्यामुळे पार्वतीला दु:ख झाले. पत्नीचे दुःख दूर करण्यासाठी भगवान शंकरांनी गजासुरास ठार मारून त्याचे शिर मुलाला बसविले तेव्हा पासून या मुलाला गजवदन म्हणू

लागले. स्कंदपुराणात या कथेचा तपशील आढळतो. याशिवाय श्री गणेश जन्माच्या इतर अनेक कथातून श्रीगणेशाचे महती स्पष्ट झाली आहे. श्री गणेशाचे मंगल रूप सुखकर्ता आणि दुःखहर्ता असल्याने सर्व मंगल कार्यारंभी श्रीगणेशाचे पूजन केले जाते. तसेच

संकटकाळी श्रीगणेश स्मरण करून दुःख दूर करण्याची प्रार्थना केली जाते. श्री गणनायक, गणपती हा गुणपती आहे.

धद्धीची देवता श्रीगणेश अर्थात गणपती याच्या रूपात अनेक वैशिष्ट्ये भावलेली आहे. गणपतीचे मस्तक हत्तीचे असून हत्ती हा स्वतः डिमान प्राणी आहे. जीवनाचा मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारा नेता बुद्धिमान असावयास हवा. हे गणनायक आम्हाला सद्बुद्धि दे' अशी प्रार्थना आपण करतो.

हत्तीचे कान

सुपासारखे असतात. सूप फोलकटे फेकून देऊन स्वच्छ

धान्यच स्वतःजवळ ठेवते हा सूपाचा गुण आहे. बोलणे सर्वांचे ऐकावे पण त्यातील सार ग्रहण करून बाकीच्या तत्व नसलेल्या गोष्टी उडवून द्याव्यात. मोठे कान उत्तम श्रवणभक्तीचे दिग्दर्शन आहेत. गणपतीचे हत्तीसारखे बारीक डोळे जीवनात सूक्ष्म ठेवण्याची प्रेरणा देतात. तर नाक (सोंड) लांब आहे म्हणजे दूरपर्यंतचा गंध येण्यास समर्थ आहे. असे सुचविते.

गणपतीला चार हात आहेत. एका हातात अंकुश, दुसऱ्या हातात
पाश, तिसऱ्या हातात मोदक आहे व चौथ्या हाताने आशीर्वाद देत आहे.
जीवनात आनंद भरण्यासाठी मोद देणाऱ्या मोदकाची गरज असते. चांगले
विचार आणि कृतीतून आनंद निर्माण होतो. वाईट विचारांना नियंत्रणासाठी
अंकुश आणि पाश यांची आवश्यकता असते. गणपतीला लंबोदर असे म्हणतात. सर्वांच्या ऐकलेल्या गोष्टी पोटात साठवून ठेवल्या पाहिजेत. स्वत:च्या पोटात अनेक गोष्टी साठवून ठेवाव्यात. गणपतीचे पाय लहान आहेत. त्यामुळे तो लवकर धावू शकत नाही. कोणतेही काम करतांना उतावीळ होऊन धावू नये. बुद्धीमानाचे पाय नेहमी तोकडे असतात. स्वत:च्या बुद्धीने ते दुसऱ्याला धाववतात. पृथ्वी प्रदक्षिणेच्या शर्यतीत गणपती स्वत:चा भाऊ कार्तिकेय ह्याच्यावर स्वत:च्या बुद्धीनेच मात केली होती. आईवडिलांना प्रदक्षिणा करून पृथ्वीप्रक्षिणा झाली असं सांगून गणपतीने बुद्धीचे सामर्थ्य मोठे असते हे सुचविले आहे.

मंगल कार्याच्या आरंभी मनाला शांत आणि स्थिर करणार्या गणपतीचे पूजन केले की कार्ये निविघ्नपणे पार पडतात. घरात गणपती आणून त्याची पूजा करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. पण सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ एकता, संघटन आणि जनजागृतीच्या दृष्टीने करण्यात आला. स्वातंत्र्यानंतरही सार्वजनिक गणेशोत्सव प्रथा कायम असून दरवर्षी या उत्सवाचा उत्साह वाढतो आहे असे दिसून येते. कारण एकत्र येण्याची ही परंपरा लोकांच्या मनाक ठसली आहे.

ध्येयमूर्ती, ज्ञानमूर्ती, व मंगलमूर्ती गणेश हे नेता आणि त्त्वेत्ता यांचे आदर्शरूप आहे. जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी मंगलमूर्तीचे आपण सतत स्मरण करतो.

नवरात्रोत्सव: मानवी जीवनात शक्तीच्या उपासनेला अगदी प्राचीन काळापासून विशेष महत्त्व आहे. दृश्य सृष्टीतील ज्या शक्तीचे रहस्य मानवाला आकलन झाले नाही त्या शक्तीभोवती देवत्वाची वलये गुंफून दैवी स्वरूपात तिची तो उपासना करू लागला. दुःखिताची दूर करणारी, नवजीवन देणारी, वात्सल्याच्या वर्षावाने सुखावून देणारी तर कधी उग्र रूप धारण करणारी रणरागिणी ही आदिशक्ती अनेक रूपातून प्रकटते. म्हणूनच आजच्या काळात देखील शक्तीची उपासना प्रेरणादायी ठरते. या उपासनेला वेदपूर्वकालापासून प्रारंभ झाल्याचे आढळून येईल. यानंतरच्या काळखंडात पुराण वाङ्मयात देवीच्या अनेक अवतार कथा निर्माण झाल्या. प्रामुख्याने स्कंद पुराण, मार्कण्डेय पुराण व देवी भागवत या ग्रंथात देवीच्या अनेक अवतार कथांचा निर्देश आहे. सज्जनांचेरक्षण आणि दुर्जनांचा नि:पात हा उद्देश या कथातून स्पष्ट होतो. देवीचे वर्णन व उत्पतीबाबत सप्तशतीत उल्लेख आढळतो. या उल्लेखानुसार महिषासुराच्या जाचाला कंटाळून देवांनी होम केला व देवीला प्रसन्न केले. महिषासुराशी

घनघोर युद्ध होऊन महिषासुराला देवीने ठार केले असा त्यात निर्देश आहे.

दुर्गा, महिषासुरमर्दिनी, काली या निरनिराळ्या नावांनी प्रसिद्ध असणारी देवी शुंभ, निशुंभ रक्तबीज, महिषासुर इत्यादी राक्षसांचा संहार करते अशा कथा आढळतात. या देवीचा उत्सव म्हणजे नवरात्र. तिने दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळविला म्हणून तिची उपासना.

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत चालणारा उत्सव म्हणजे नवरात्र! दुर्गादेवीचा उत्सव म्हणून जो कार्यक्रम बंगालमध्ये प्रसिद्ध आहे. त्यालाच महाराष्ट्रात शारदीय नवरात्र म्हणतात. शरदऋतूला प्रारंभ झाल्यापासून हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.

महाराष्ट्रातील बहुतेक घराघरातून हा उत्सव होतो. चार देवतांपैकी कोणतीही कुलदेवता असली तरी उपासना प्रकार थोड्याफार फरकाने एकच असतात. या देवतांची आणि त्यांच्या पराक्रमाची वर्णने अग्निपुराण, देवीभागवत, सप्तशती या ग्रंथात आढळतात. सप्तशती हा ग्रंथ मुख्य उपासना ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात सातशे श्लोक देवता वर्णन केले असल्याने या ग्रंथाला सप्तशती असे नाव पडले आहे. समर्थ रामदासांनीही

देवी उपासना साठी आठ-दहा स्तोत्रे लिहिली आहेत. त्यांनी रचलेली आरती आज घराघरात म्हटले जाते. आदिमाया, प्राण रूपिणी, भुवनेश्वरी, भवानी इत्यादी नावांनी त्यांनी देवीला साकडे घातले आहे. नवरात्र उत्सव हा आता घराघरातून उत्साहाने साजरा होतो. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव प्रमाणे सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करण्याची प्रथा आज अनेकठिकाणी पहावयास मिळते. नवरात्र उत्सावानिमित्त विविध कार्यक्रमांचे सार्वजनिकरित्या करून भक्ती सोहळा असे व्यापक स्वरूप येत आहे.

विजयादशमी : नवरात्र उत्सवाची सांगता अर्थात विजयादशमी होय. राम-रावण युद्धात अश्विन शुद्ध दशमीला रावणाचा वध झाला.
या विजयाची आठवण करून देण्यासाठी यादिवशी विजयोत्सव साजरा करतांना रावणाच्या प्रतिमेचे दहन करतात. रावणवध निदर्शक देखावा करून रावणाची प्रतिमा अग्नीज्वाळेत भस्म करतात. फटाके वाजवतात

दसरा सण मोठा ।

नाही आनंदा तोटा॥' असं म्हणतात. यादिवशी सर्वत्र आनंदीआनंद साजरा करतात. विजयादशमीच्या मुहुर्तावर अनेक शुभसंकल्प मनात कल्पून चांगल्या कामाचा मुहूर्ताचा दिवस विजयादशमी असून संकल्पापासून सिद्धीपर्यंत वाटचाल करण्याचे ठरविले जाते. मोहाच्या महिषासुराला मारण्याचा दिवस अर्थात विजयादशमी असून अनेक पुराणकथातून, इतिहासातून या दिवसाची महती स्पष्ट केलेली आहे.

दिवाळी : दीपोत्सव म्हणजे आनंदाचा उत्सव, उल्लासाचा उत्सव

आणि प्रकाशाचा उत्सव होय. 'तमसो मा ज्योतिर्गमय । अंधारातून प्रकाशाकडे नेणारा समृद्धीबरोबर ऐक्य संवर्धन करणारा उत्सव म्हणजे दिवाळी. अश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया असा सहा दिवस चालणारा हा उत्सव असून वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, श्री लक्ष्मी पूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज या दिवसांचे संमेलन म्हणजे दिवाळी होय. दिवे लावण्याचा हा सण म्हणून दिवाळी म्हणतात. या दिवसात प्रत्येक घराच्या दारात आकाशकंदील लावला जातो. 

१. वसुबारस : दिवाळीचा सण धनत्रयोदशीपासून प्रारंभ होत असला तरी अश्विन वद्य द्वादशी पासून या सणाचा खरा प्रारंभ होतो. वसुबारस, गोवत्स द्वादशी किंवा गौबारस असेही या दिवसाला म्हटले जाते. इंद्र पाऊस पाडतो म्हणून इंद्राची पूजा केली पाहिजे अशी गोकुळातील लोकांची श्रद्धा होती. परंतु 'गोवर्धन पर्वतामुळे पाऊस पडतो, आपण त्याची पूजा केली पाहिजे.' असे श्रीकुष्णाने गोकुळातील लोकांना

सांगितले. गोकुळातील लोकांनी गोवर्धनाची पूजा केल्यामुळे इंद्राने चिडून जाऊन वृंदावन आणि गोकुळावर मुसळधार पावसाचा वर्षाव केला. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन उचलून धरून त्याखाली गोकुळवासीयांचे रक्षण केले. तो दिवस म्हणजे वसूबारस' होय.

२. धनत्रयोदशी: धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस होय. भारतीय संस्कृतीमध्ये लक्ष्मीला आई समजून पूजनीय मानली आहे. वैदिक ऋषीनी तर लक्ष्मी उद्देशून गाईलेले आहे.

ॐ महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि। कान मांग

तन्नो लक्ष्मी : प्रचोदयात ॥ (महालक्ष्मीला मी जाणतो. (ज्या) विष्णुपत्नीचे ध्यान करतो त्या लक्ष्मीने आमच्या मन बुद्धीला प्रेरणा द्यावी) लक्ष्मी चंचल आहे असे सांगितले जाते. परंतु लक्ष्मी चंचल नसून लक्ष्मीवानाची वृती चंचल असते. लक्ष्मीमुळे मानव देव होऊ शकतो तसेच दानवी वृती देखील निर्माण होऊ शकते. विपरित मार्गाने वापरली जाते ती अलक्ष्मी होय. म्हणून उदारतेने चांगल्या कार्यासाठी लक्ष्मीचा वापर व्हावा यादृष्टीने लक्ष्मीपूजन करावे ही या सणामागील प्रथा-परंपरा आहे.

३. नरकचतुर्दशी : नरकचर्तुदशीला कालीचतुर्दशी देखील म्हणतात. नरकचतुर्दशी कथा अशी आहे - प्रागज्योतिषपुराचा राजा नरकासुर शक्तीमुळे सैतान बनला होता. स्वत:च्या शक्तीमुळे तो सर्वांना त्रास देत होता. इतकेच नव्हे तर स्त्रियांना सतावित होता. त्याने स्वत:च्या जनानखान्यात सोळा हजार कन्यांना कैद करून ठेवले होते. भगवान श्रीकृष्णाने त्याचा नाश करायचा विचार केला. तसेच सत्यभामा नरकासुराचा वध करण्याचा निर्धार केला. भगवान श्रीकृष्ण या कामी मदतीला धावले. चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचा नाश झाला. नरकासुराच्या जाचातून मुक्त झालेल्या लोकांनी विजयोत्सव साजरा केला. आसुरी प्रवृतीचा नाश आणि सत्तप्रवृतीची स्थापना अशी आठवण

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)