महाराष्ट्रामध्ये अभंगवाणी हि खूप आहे कारण आपल्या मराठी भूमीला खूप सारे संत भेटलेले आहेत त्यांचे अभंग खालील प्रमाणे
अभंगवाणी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, श्री नामदेव, श्री एकनाथ, श्री तुकाराम यांनी शेकडो अभंगांची रचना केली. या अभंगवाणीतून समाजमने घडविली. आजही या अभंगाचे शब्द अनेकांच्या ओठावर सहजतेने येतात. नित्यपाठ करण्यासाठी काही अभंगरचना या ठिकाणी दिल्या आहेत.
संत तुकारामांचे अभंग
(१)
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी।
कर कटावरी ठेवूनिया॥
तुलसीहार गळा कासे पीतांबर ।
आवडे निरंतर हेचि ध्यान॥ध्रु॥
मकरकुंडले तळपती श्रवणी।
कंठी कौस्तुभमणी विराजित॥
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख।
पाहीन श्रीमुख आवडीने॥
(२) जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले ।।स तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा ॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ॥। त्यासी आपंगिता नाही। त्यासी धरी जो हृदयी।। दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी।। तुका म्हणे सांगू किती। तोचि भगवंताची मूर्ति ।।
(३) जरी झाला भाग्यवंत । तरी का भेटेल भगवंत॥ उंच वाढला एरंड। तरी का होईल इक्षुदंड।। जरी गर्दभ वेगी द्यावे। तरी का अश्वमोल पावे ॥ तुका म्हणे तोचि थोर । ज्याचे मुखी रघुवीर।
(४) अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ। त्याचे गळा माळ असो नसो॥ आत्मअनुभवी चोखाळिल्या वाटा। त्याचे माथां जटा असो नसो॥ परद्रव्या अंध निंदेसी जो मुका। । तोचि संत देखा तुका म्हणे॥
(५)। बोले तैसा चाले। त्याची वंदीन पाऊले॥ अंगे झाडीन अंगण । त्याचे दास्यत्य करीन । त्याचा होईन किंकर। उभा ठाकेन जोडुनि कर॥ तुका म्हणे देव । त्याचे चरणी माझा भाव।।
(६)जोडोनिया धन उत्तम वेव्हारे ।
उदास विचारे वेच करी ॥ उत्तमचि गती तो एक पावेल। उत्तम भोगील जीव खाणी॥ परउपकारी नेणे परनिंदा। परस्त्रिया सदा बहिणी माया।। भूतदया गायी पशूंचे पाळण। तान्हेल्या जीवन वनामाजी॥ शांतिरूपे नव्हे कोणाचे वाईट। वाढवी महत्त्व वडिलांचे॥ तुका म्हणे हेचि आश्रमाचे फळ। परमपद बळ वैराग्याचे॥
(७) आलिया भोगासी असावे सादर। देवावरी भार घालुनिया॥ तोचि कृपासिंधु निवारी सांकडे। येर ते बापुडे काय रंक॥ भवाचिये पोटी दुःखाचिया राशी। शरण देवासी जाता भले॥ तुका म्हणे नव्हे काया त्याकरिता। चिंतावा तो आता विश्वंभर ।।
(८) साम्ट । जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे । या अंत:काळीचे नाही कोणी॥जाल्या हीन शक्ती नाक डोळे गळती। सांडोनि पळती रांडा पोरे ॥
आईल म्हणे खर मरता तरी बरे। भोसले हे घर धुंकोनिया॥ तुका म्हणे माझी न होत ही कोणी । तुज चक्रपाणी वाचूनिया ॥
(९)तीन शिरे सहा हात। तया माझा दंडवतजाति
कांखे झोळी पुढे श्वान। नित्यजान्हवीचे स्नान । माथा शोभे जटाभार । अंगी विभूति सुंदर। मिनट का शंख चक्र गदा हाती। पायी खडावा गर्जती॥
तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार॥।
(१०)हेचि थोर भक्ति आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेचि रहावे। चित्ति असो द्यावे समाधान। वाहिल्या उद्वेग दु:खचि केवळ । भोगणे ते कष्ट संचिताचे॥ तुका म्हणे घालू तयावरी भार। वाहू हा संसार देवापा
संत जनाबाईचे अभंग
(१) ये ग ये ग विठाबाई। माझे पंढरीचे आई। भीमा आणि चंद्रभागा। तुझ्या चरणीच्या गंगा। इतक्यांसहि त्वा या यावे। माझ्या रंगणी नाचावे।॥ माझा रंग तुझे गुणी । म्हणे नामयाची जनी ।।
(२) धरिला पंढरीचा चोर । प्रेमे बांधोनिया दोर।। हृदय बंदिशाळा केले । आंत विठ्ठला कोंडिला।॥ शब्द केली जडाजोडी । पायी विठ्ठलाच्या बेडी।। सोऽहं शब्दे मारा केला। विठ्ठल काकुळती आला॥ जनी म्हणे गा विठ्ठला। आता जीवे न सोडी तुला॥
(३) विठो माझा लेकुरवाळा। संगे लेकुरांचा मेळा।। निवृत्ति हा खांद्यावरी। सोपानाचा हात धरी। पुढे चाले ज्ञानेश्वर। मागे मुक्ताई सुंदर ॥ 1. गोरा कुंभार मांडीवरी। चोखा जीवा बरोबरी। बंका कडियेवरी। नामा करांगुळी धरी॥ जनी म्हणे रे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा ॥
संत ज्ञानेश्वरांचे अभंग की
(१) जीजा अवघाचि संसार सुखाचा करीन। आनंदे भरीन तिन्ही लोक॥१॥ जाईन गे माय तया पंढरपुरा। भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥ सर्व सकृताचे फळ मी लाटीन। क्षेम मी देईन पांडुरंगी॥३॥ बापरखुमादेवीवरू विठ्ठलेसी भेटी। आपुले सवसाठी करूनी ठेला॥४॥
।। (२)। ।
रूप पाहता लोचनी। सुख झाले वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा।
तो हा माधव बरवा॥धृ॥
म्हणुनि विठ्ठल आवडी॥
बहुत सुकृताची जोडी।
सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेवीवर
(३)
माझे जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी॥१॥ पांडुरंगी मन रंगले। गोविंदाचे गुणी वेधले॥२॥ TRIE जागृती स्वप्न सुषुप्ति नाठवे। पाहतो रूप आनंदी आनंद साठवे ॥३॥ बापरखुमादेवीवर सगुण निर्गुण। रूप विटेवरी दाविली खुण ॥४॥
संत नामदेवांचे अभंग
(१) अमृताहुनि गोड नाम तुझे देवा। मन माझे केशवा कां बा नेघे॥ सांग पंढरीराया काय करू यासी। का रूप ध्यानासी न ये तुझे। कीर्तनी बैसता निद्रे नागविले। मन माझे गुंतले विषयसुखा॥ हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती। न ये माझ्या चित्ती नामा म्हणे ॥
(२)
देह जावो अथवा राहो।
पांडुरंगी दृढ भावो॥ चरण न सोडी सर्वथा।
आण तुझी पंढरीनाथा ।।
नामा म्हणे केशवराजा । केला पण चालवी माझा॥
संत एकनाथांचे अभंग
(१) जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले। मग या विठ्ठले कृपा केली॥ जन्मोनी संसारी झालो त्याचा दास। माझा तो विश्वास पांडुरंगी॥ Image नामा भ्रमर सुवासी मधावरी मासी। तैसे या देवासी मन माझे ॥ ন मघी आणिका देवासी नेघे माझे चित्त।। गोड गाता गीत विठोबाचे॥ एका जनार्दनी मज तेथे न्यावे। हाडसोनी द्यावे संतांपाशी ॥
(२) साधन ते सार पंढरीची वारी। आन तूं न करी सायासाचे॥
वेद घोकिता चढे अभिमान । नाडेल तेणे जाण साधन ते॥
शाखमतवादकासया पसारकर सारासार वारी एक।।
पुराण सांगता मन वेडावले। हिंदू जे लागले आणि काशी॥
गंध पहावे तरी आयुष्य क्षणिका व्यर्थ खटपट करूनि काई ॥
एका जनार्दनी साराचे पैं सार। विठ्ठल त्रिअक्षर जप करी।
संत कान्होपात्रा
पतित तू पावना। म्हणविसी नारायणा ।
तरी सांभाळ वचना। ब्रीद वागविसी जाण ।।
याति शुद्ध नाही भाव। दुष्ट आचरण स्वभाव।।
मुखी नाम नाही। कान्होपात्रा शरण पायी।।
संत गोरा कुंभार
देवा तुझा मी कुंभार। नासी पापाचे डोंगर।।
ऐशा संतप्ते हो जाती। घडे साधूची संगती॥
पूर्ण कृपा भगवंताची । गोरा कुंभार मागे हेचि ॥
संत नरहरी सोनार
देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार।
देह बागेसरी जाणे। अंतरात्मा नाम सोने ॥
त्रिगुणाची करूनी मूस । आत ओतिला ब्रह्मरस|।
जीव शिव करूनी फुंकी। रात्रंदिवस ठोकाठोकी।
विवेक हातोडा घेऊन । कामक्रोध केला चूर्ण।।
समृध्दीची कातरी । रामनाम सोने चोरी।।
ज्ञान ताजवा घेऊन हाती। दोन्ही अक्षरे जोखिती॥
खांद्या वाहोनी पोतडी। उतरला पैलथडी।।
नरहरी सोनार हरीचा दास। भजन करी रात्रंदिवस।।
संत सावता माळी
कांदा मुळा भाजी। अवघी विठाबाई माझी ॥
लसूण मिरची कोथंबिरी। अवघा झाला माझा हरी॥
मोट नाडा विहीर दोरी। अवघी व्यापिली पंढरी॥
सावता म्हणे केला मळा। विठ्ठल पायी गोवला गळा॥
संत सेना न्हावी सह
आम्ही वारीक वारीक। करू हजामत बारीक॥
विवेक दर्पण आयना दाऊ। वैराग्य चिमटा हाल॥
उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ॥
भावार्थाच्या बगला झाडू। काम, क्रोध, नखे काढू ॥
चौवर्णा देऊनी हात। सेना राहिला निवांत॥
संत चोखामेळा
विठ्ठल विठ्ठल गजरी। अवघी दुमदुमली पंढरी॥ होतो नामाचा गजर। दिंड्या पताकांचा भार ॥ म निवृत्ती ज्ञानदेव सोपान। अपार वैष्णव ते जाण ॥ हरी कीर्तनाची दाटी। तेथे चोखा घाली मिठी॥
Post a Comment