मनाचे श्लोक ( manache shlok )

 

 मनाचे श्लोक




श्री समर्थ रामदासांनी 'मनाचे श्लोक' मधून संसारी जनांना उपदेश केला आहे. हा उपदेश, मनोबोध अर्थात ज्ञानमार्गदर्शक आहे. हा उपदेश मनासच करण्याचे कारण हे की मनुष्याला बंधव मोक्ष यांची प्राप्ती करून देणारे मनच आहे. विचार, उच्चार आणि आचार यात एकवाक्यता ठेवावी, सर्वदा रामभजनी तत्पर असावे हे मनाचे श्लोक यातील सार आहे. समर्थांनी केलेला उपदेश सदासर्वकाळ उपयोगी ठरणारा आहे. म्हणूनच घरोघरी या श्लोकांचे पठण केले जाते. आपल्याला मनाशी बोलावयाला व मनाशी बोलताना मनोवाचातीत अशा राघवाचा पंथ' शोधावयाला ह्या श्लोकांनी लोकांना शिकविले आहे. हे श्लोक २०५ आहेत. सर्वच श्लोक नित्य पठण करण्यासारखे आहेत. या श्लोकातील काही श्लोक मुद्दामच येथे देत आहे. या श्लोकांचे विद्यार्थ्यांनी मनोभावे पाठांतर करावे हीच अपेक्षा.


मनाचे श्लोक:


गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा । नमू शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा ॥१॥


मना सज्जना भक्तिपंथेचि जावे िर: तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे। मन जनी निंद्य ते सर्व सोडुनि द्यावे ाड जनी वंद्य ते सर्व भावे करावे ॥२ ॥


प्रभाते मनी राम चिंतीत जावा 

पुढे वैखरी राम आधी वदावा।

सदाचार हा थोर सांडू नये तो 

जनी तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥


मना वासना दुष्ट कामा नये रे

मना सर्वथा पापबुद्धी नको रे ।

मना सर्वथा नीति सोडू नको हो

मना अंतरी सार विचार राहो ॥४॥


मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे

मना बोलणे नीच सोशीत जावे ।

स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे 

मना सर्व लोकांसि रे नीववावे॥५॥


जनी सर्वसुखी असा कोण आहे

 विचारें मना तूंचि शोधूनि पाहे। 

 मना त्वांचि रे पूर्वसंचित केले

  तयासारिखें भोगणे प्राप्त झाले॥६॥


समर्थाचिया सेवका वक्र पाहे। असा सर्व भूमंडळी कोण आहे ? जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा राम दासभिमानी ।॥७॥


मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी प्रपंचिक नाहीं जयाते उपाधी। सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥८॥


जनी भोजनी नाम वाचे वदावे अती आदरें गद्य घोषे म्हणावें। हरीचिंतने अन्न जेवीत जावे ATH तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे॥९॥


अतीलीनता सर्वभावे स्वभावे जना सज्जनांलागि संतोषवावे।


देहे कारणी सर्व लावीत जावें सगुणी अती आदरेसी भजावे॥१०॥


विवेके क्रिया आपुली पालटावी 

अती आदो श्द किया क्रिया धरावी। जनीं बोलण्यासारिखे चाल बापा ी

मना कल्पना सोडि संसारतापा ।।११ ॥।


जनी वादवेवाद सोडूनि द्यावाजनी वादवेवाद सोडूनि द्यावा ।

 जनी सुखसंवाद सुखें करावा। 

 जनी तोचि तो शोकसंताप हारी 

 तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥१२॥


मना अल्पसंकल्प तो ही नसावा सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा। जनी जल्प विकल्प तोही त्यजावा ठा रमाकांत येकांतकाळी भजावा ॥१३॥


नसे गर्व आंगी सदा वीतरागी

क्षमाशांती भोगी दयादक्ष योगी।

नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा

 इही लक्षणी जाणिजे योगिराणा॥१४॥

 

अविद्यागुणे मानवा उमजेनाभ्रमे चुकले हीत ते आकळेना। परीक्षेविणे बांधले दृढ नाणे परी सत्य मिथ्या असे कोण जाणे ॥१५


जगी पाहतां चर्मचक्षी न लक्षे

जगी पाहाता ज्ञानचक्षी न लक्षे। जगी पाहता पाहणे जात आहे

मना संत आनंत शोधूनि पाहे ॥१६॥


जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैची। अहंभाव ज्या मानसीचा विरेना तया ज्ञान हें अन्न पोटी जिरेना ॥१७॥


नको रे मना वाद हा खेदकारी नको रे मना भेद नानाविकारी। अहंभाव जो राहिला तुजपासी ॥१८॥


स्वरूपी उदेला अहंकार राहो तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहों। दिशा पाहता ते निशा वाढताहे विवेके विचारे विवंचूनि पाहे ॥१९॥


सदा सर्वदा राम सन्निध आहे मना सज्जना सत्य शोधून पाहे।।

अखंडित भेटी रघुराजयोगु मना सांडि रे मीपणाचा वियोगु ॥२०॥

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)