घरातील वस्तूंची वस्तू कशी असावी १

खिडक्यांचा सबंध

खिडक्या म्हणजे वास्तूचे डोळे अशी संकल्पना आहे व हे डोळे निर्दोष असावेत. खिडक्यांचा व वास्तुसौख्याचा सबंध आहे. म्हणून खिडक्या का, किती व कशा असाव्यात? या सबंधी

१) खिडक्या पूर्वेस जास्तीत जास्त असाव्यात. त्याने बुद्धिमत्ता वाढते. नसल्यास रोगराई वाढते.
२) खिडक्या उत्तरेस जास्त असल्यास पैसा भरपूर येतो, नसल्यास आर्थिक चिंता.
३) पश्चिमेस जास्त खिडक्या मध्यम फळे.
४) दक्षिणेस जास्त खिडक्या - वाईट.
५) सम संख्येत खिडक्या असाव्यात. पण १०, २०, ३० अशा नसाव्यात.
६) खिडक्यांना काचा फुटक्या नसाव्यात. अनेक अडचणी उद्भवतात.
७) खिडक्यांची मांडलेली नसावीत. कुरबुरी निर्माण होतात.
८) खिडक्या नेहमी ओळंब्यात असाव्यात नसल्यास भय निर्माण होते.
९) खिडक्या पेंट केलेल्या व आतील बाजूस उघडणाऱ्या असाव्यात.
१०) खिडक्यांवर सज्जा नसल्यास उत्तम.


घराच्या दरवाजाला उंबरठा का असावा?

घराच्या दाराला असलेल्या उंबरठयाचे पूजन करणे हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. घराच्या दाराचा उंबरठा हा रक्षण करणारा आहे. पूर्वी असाही समज होता की, एखाद्या व्यक्तीची येण्याची वेळ टळून गेल्याव-रही ती व्यक्ती आली नाही किंवा एखादी व्यक्ती

WELCOME image door

लवकर यावी असे वाटत असेल, तर उंबरठयावर थोडेसे मीठ टाकले जात असे किंवा एखादे फुलपात्र पालथे ठेवले जात असे.
वास्तुशास्त्र

उंबरठा म्हणजे घराची लक्ष्मणरेषा. दरवाजात आलेल्या व्यक्तील आत घ्यायचे की बाहेर ठेवायचे हे उंबरठयावरच निश्चित करायजे असते. एखादी व्यक्ती जेंव्हा घराच्या उंबरठयाबाहेर पाऊल टाकते, तेव्हा तो एक मूक साक्षीदार असतो.

उंबरठा म्हणजे मर्यादा. आपल्या जीवनात विचार, विकार, वाणी, वृत्ती आणि वर्तन यावर काही मर्यादा असाव्यात. ऋषींनी व आचार्यानी वेदमान्य विचार सांगितले आहेत. ते आचारणात आणले पाहिजे. विकारांवरही बंधन असले पाहिजे. निबंध विकार व्यक्ती व समाज दोघांचेही स्वास्थ्य नष्ट करतात. पा मि वाणी मर्यादा शोभणारी असली पाहिजे.

अनियंत्रित वाणी गो अनर्थ निर्माण करते, तर सुनियंत्रीत वाणी पृथ्वीवरील स्वर्ग देखील न निर्माण करु शकते. प्रभू श्रीरामचंद्रांनी आपल्या जीवनात या सर्व मर्यादांचे पालन केले होते. म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात.

घरात आलेल्याची बातमी देणारा, वैभव व चारित्र्यरक्षक, उ लक्ष्मणरेषा व मर्यादा पालनाचा प्रेक असा उंबरठा प्रत्येक दाराला हवाच आणि गृहलक्ष्मीने उंबरठयाचे पूजन करुन अशी प्रार्थना करायची की, हे प्रभो, माझ्या दारात सैतानाचे नाही तर संताचे स्वागत व्हावे.

तसेच दारिद्रयाचे नाही तर लक्ष्मीचे पूजन व्यावे आणि माझे घर हे भोगाने होणाऱ्या भितीने नाही तर प्रसादाने प्राप्त होणाऱ्या प्रृतने व्यापलेले असावे.

घरात पूर्वजांचे फोटो कोठे असावेत?

घरात देवांचे फोटो व पूर्वजांचे फोटो शेजारी शेजारी किंवा जवळ जवळ लावण्याची चूक अनेकजण करतात. त्यामुळे एखादे अरिष्ट कोसळण्याची दाट शक्यता असते. हे टाळण्यासाठी देव व पूर्वजांचे फोटो एकमेकांपासून लांब अंतरावर लावले पाहिजेत. दिवंगत झालेल्या पूर्वजांचे फोटो कोठे असावेत, याची काही खास नियम आहेत. असे फोटो नैऋत्या दिशेचा कोनाडा किंवा

पश्चिम दिशेलाच लावले पाहिजेत. असे केल्याने पूर्वजांचा दुवा मिळून तुमचा प्रपंच सुख समाधानाचा व आनंदाचा होतो. सर्व घर गोकुळाप्रमाणे एकदिलाने नांदते. भांडण तंटे मतभेद शक्यतो होत नाहीत.


दर्शनी भिंत ओबडधोबड दगडांची नसावी

वास्तूचा विचार करताना त्या वास्तूमध्ये उतार हा पूर्वस व उत्तरेस हवा तसा असणे, म्हणजेच बांधकामाचे जोते पूर्वेस व उत्तरेस कमी उंचीचे, दक्षिण व पश्चिम दिशेस जास्त उंचीचे असणे फायदेशीर असते. त्याचप्रमाणे त्याचे बांधकाम देखील नैऋत्य, पश्चिम, दक्षिण दिशांना उंच असणे शुभ असते.

वरीलप्रमाणे स्थिती असता, घरातील वातावरण व्यवस्थित राहते. खर्च कमी होतो. व्यवहार सुरळीत चालतात. प्लॉटमधील बांधकामामध्ये भिंती दगडी नसाव्यात. अशा वास्तूमध्ये १-२ पिढ्याच राहतात. पुढील पिढ्या मात्र वास्तू सोडून काही कारणाने लांब जातात.

दर्शनी भिंती या ओबडधोबड दगडांच्या असता, कुटुंब सुखी नसते. भिंतींना चिरा जाणे, तडे जाणे, कमानींना चिरा जाणे यामुळे कुटुंबावर संकटे येतात. पूर्वेकडील भिंत शेवटी बांधावी म्हणजे बांधकामास विलंब लागणार नाही. 

भिंत व जमिनीस ओल नसावी. आजारपण असते.अशाप्रकारे काही विशिष्ट पथ्यं भिंती बांधताना पाळणे हे गृहसौख्याच्या दृष्टीने उत्तम असते.



प्रवेशद्वार आकर्षक असावे

वास्तुशास्त्रात वास्तुच्या रचनेविषयी विविध माहिती दिली आहे. कोणती खोली कोणत्या दिशेस असावी यासोबत विशिष्ट खोलीतील रचना कशी असावी याचीही सविस्तर माहिती आहे. घराचा उंबरठा, घरातील सर्व मंडळी जिथे एकत्र येतात असा दिवाणखाना, 

स्वयंपाकघर आणि आपल्या आयुष्यातील एक तृतीयांश काळ व्यतीत करतो ते शयनगृह (बेडरुम) या सर्वांना नहत्त्व नक्कीच अधिक आहे. मग या खोलींमधील विविध गोष्टींच् चनेचा आपल्या जीवनावर प्रभाव पडणंही आलंच. सर्वप्रथम घराचे प्रवेशद्वार हे प्रसन्न शुभचिन्हांनी सुशोभित

आकर्षित करणारे असावे. प्रवेशद्वाराला लाकडी टंबरठा असावा. बन्याच ठिकाणी मार्बलचे उंबरठे असतात. पण वास्तूच्या महत्त्वाच्या समीकरणाला यामुळेच तडा जात असतो. दरवाजा म्हणजे चौकट, लाकडाशिवाय दगडी उंबरठा लावून आपण या चौकटीचे त्रीकट करतो आणि त्रीकट म्हणजे अशांती. प्रत्येकाने आपला उंबरठा शुभ मुहूर्तावर करुन घेणे अत्यंत महत्वाचे आहे. 

उंबरठयाला शास्त्रात अत्यंत महत्व आहे आणि हाच उंबरठा ओलांडून आपण घरात प्रवेश करतो. प्रवेशद्वारापाशी लागूनच असलेल्या खोलीस आपण हॉल किंवा दिवाणखाना म्हणतो.

दरवाजाच्या झडपा आत उघडणाऱ्या असाव्यात

प्लॉट घेऊन घराचे बांधकाम करणाऱ्या वास्तुशास्त्राच्या पद्धतीनुसार बांधकाम करावे. कारण त्यांना जमीन उपलब्ध असते आणि विशिष्ट पद्धतीने वास्तूची मांडणी करणे सोपे जाते. 

घराची दारे बंद करताना अथवा उघडताना वाजू नयेत. त्यामुळे भित्ती निर्माण होते. त्यासाठी बिजागऱ्यांना तेलपाणी करणे शुभ असते. मुख्य दरवाजाच्या झडपा बाहेर उघडणाऱ्या असू नयेत, तर आत उघडणाऱ्या असाव्यात, अन्यथा अडचणी येऊन घरातील वातावरण त्रासदायक वाटते. दरवाजाची उंची, रुंदी सम प्रमाणात असावी. 

घरामध्ये एका रेषेत दोन पेक्षा जास्त दरवाजे नसावेत. दरवाजे जर ओळंब्यात नसतील, तर आर्थिक नुकसान संभवते. मुख्य दरवाजाला व्हेंटीलेटर असणे महत्वाचे असते. त्यामुळे घरी आनंद खेळतो आणि परमेश्वर डोकावून पाहतो व कृपादृष्टी ठेवतो. चिरलेला दरवाजा त्वरीत बदलावा.

घराचा सूर्य दरवाजा अडथळा विरहित असावा

वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा ही आपल्या भागया प्रभाव पाडणाऱ्या अनेक गोष्टींपैकी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण घराच्या तोंडातूनच (मुख्य दरवाजातूनच) सर्व ऊर्जा आणि सद्भाग्य आपल्या धरात प्रवेश करत असते. म्हणून मुख्या

दरवाजाच्या आतील व बाहेरील रचना सुयोग्य असली पाहिजे. मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस किंवा बाहेरील बाजूस कोणत्याही प्रकारचा अडथळा नसावा. मुख्य दरवाजाजवळ असलेला कोणताही अडथळा हा सद्भाग्याला दुर्भाग्यामध्ये बदलू शकतो इतके महत्व आहे. अडथळाविरहित मुख्य दरवाजाला वास्तविक पाहता घराचा मुख्य दरवाजा हा प्रशस्त व भरपूर प्रकाश देणारा असावा. 

बऱ्याचदा दरवाजा अगदी लहान वा अरुंद चौकटीचा असतो. त्यामुळे भरपूर प्रकाश आत येत नाही. असा हा दरवाजा एखाद्या मोठ्या खोलीत वा स्वागत कक्षात उघडला जाईल, अशी व्यवस्था केलेली असावी. महत्वाची बाब म्हणजे, या दरवाजासमोर चपलांची मांडणी (चप्पल स्टॅन्ड) किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा अडथळा असता कामा नये. 

घराच्या मुख्य दरवाजासमोर इमारतीचा खांब असणे हा सुद्धा एक प्रकारचा अडथळाच आहे. हा खूपच गंभीर स्वरुपाचा दोष आहे. म्हणून मुख्य दरवाजा योग्य स्थानावर सरकावून हा दोष त्वरीत सुधारुन घेतला पाहिजे.



0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)