Devachi Arthi देवीची आरती



 देवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी। अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी ॥ वारी वारी जन्मामरणाते वारी । हारी पडलो आता संकट निवारी ॥ १ ॥ जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी । सुरवर ईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ ध्. ॥ त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसी नाही। चारी श्रमले परंतु न बोलवे कांहीं ॥ साही विवाद करिता पडिले प्रवाही । ते तु भक्तांलागी पावसी लवलाही ॥ जय. ॥ २

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा। क्लेशापासूनी सोडी तोडी भव पाशा ॥ अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ॥ जय. ॥


गणपतीची आरती

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।

सर्वांगे सुंदर उटी शेंदूराची । कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥ १ ॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥

रत्नखचित बरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुम केशरा । हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।

रुणझुणती नृपुरे चरणी घागरिया ॥ 2 ॥ लंबोदर पितांबर फणीवर वंदना

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना । दास रामाचा वाट पाहे सदना ।

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना । जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥ ३ ॥


शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रह्माण्डी माळा । विषे कण्ठ काळा त्रिनेत्री ज्वाळा লावण्य सुन्दर मस्तकी बाळा । तेथूनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा। आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥

जयदेव जयदेव

कर्पूगौरा भोळा नयनी विशाळा । अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा । विभूतिचे उधळण शीतकण्ठ नीळा । ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव जय देव जय श्री शंकरा। आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥

जयदेव जयदेव

ची दैत्यी सागरमन्थन पै केलें । त्यामाजी अवचित हळहळ जें उठिले। ते त्वां असुरपणे प्राशन केलें। नीलकण्ठ नाम प्रसिद्ध झालें। जय देव जय देव जय श्रीशंकरा। आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥ जयदेव जयदेव

गाम्बर फणीवर सुन्दर मदनारी । पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी। शतकोटीचें बीज वाचे उच्चारी । रघुकुलतिलक नामदासा अन्तरी ॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा। आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥

"तमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत. सर्वांना सुख, समृद्धी, अध्र्या, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.


दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा । त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा । नेति नेति शब्द न ये अनुमाना । सुरवर-मुनिजन-योगी-समाधि न ये ध्याना ।। १ ।।

जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता । आरती ओवाळिता हरली भवचिंता ।। धृ? ||

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त । अभाग्यासी कैंची कळेल ही मात । पराही परतली तेथे कैंचा हेत । जन्ममरणाचा पुरलासे अंत ।। २ ।। दत्त येऊनिया उभा ठाकला |

सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ।

प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ।। ३ ।। दत्त दत्त ऐसे लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन । मीतूपणाची झाली बोळवण । एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ।। ४ ।।


विठ्ठलाची आरती

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुण्डलिकाचे भेटी परब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥ जय देव जय देव जय श्री पांडुरंगा । रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ॥

तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी ।

देव सुरवर नित्य येती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती ॥२॥

धन्य वेणूनाद अणु क्षेत्रपाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।

राही रखुमाबाई राणीया सकळा ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥३॥

ओवाळू आरत्या कुरवण्ड्या येती

चन्द्रभागेमाजी सोडुनिया देती। दिंड्या पताका वैष्णव नाचती

पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती ।

दर्शन होता मात्रे होय तया मुक्ति केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥५॥

घालीन लोटांगण

घालीन लोटांगण, वंदीन चरण । डोळ्याने पाहीन रुप तुझें ।

आरत्या संपतांक्षणीच म्हणावयाचें भजन घालीन लोटांगण, वंदीन चरण । डोळ्यांनी पाहीन रुप तुझे ।। प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन । भावें ओंवाळिन म्हणे नामा ।।१ । त्वमेव माता च पिता त्वमेव । त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्व मम देवदेव ।।२।। कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात् । करोमि यद्यत् सकलं परस्मै, नारायणायेति समर्पयामि ।।३।। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् । श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकां रामचंद्रं भजे ।।४।। हरे राम हरे राम, राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।।५।।


मंगलमूर्ती मोरया ।। गणपती बाप्पा मोरया ।। मोरया रे बाप्पा मोरया रे ।। मोरया रे बाप्पा मोरया रे ।।


मंत्र पुष्पांजली

ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।

ते हं नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः संति देवाः ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने ।

नमो वयं वैश्रवणाय कूर्म हे समे काम काम काम मह्यम् । कामेश्वरो वैश्रवणो दधातू।

कुबेराय वैश्रवणाय। महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं

भौज्यं, स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी स्यात्सार्वभौमः सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै

समुद्रपर्यंता या एकराळिति तदप्येष श्लोक ओम भिगीतो मरुतः

परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे आविक्षतिस्य कामप्रेर्विश्वेदेवाः

सभासद इति


उंदरावरि बैसोनी

उंदरावरि बैसोनी दुडादूडां येसी । हाती मोदक लाडू घेऊनियां खासी ।। भक्तांचे संकटी धावून पावसी ।। दास विनवीती तुझिया चरणांसी ।।१।। जय देव जय देव जय जय गणराजा ।। सकळ देवा आधी तू देव माझा ।। जय देव.।। धृ.।। भाद्रपद मासी होसी तूं भोळा आरक्त पुष्पांच्या घालुनियां माळा।। कपाळी लावूनि कस्तुरी टिळा।। तेणें तूं दिससी सुंदर सांवळा।। जय.।।२।। प्रदोष चे दिवशी चंद्र शापीला।। समयीं देवे मोठा आकांत केला।। इंद्र येवोनी चरणी लागला।। श्रीरामा बहुत शाप दीधला ।।जय.।।३। । पार्वतीच्या सुता तूं एं गणनाथा ।। नेत्र शिणले तुझी वाट पाहतां ।। किती अंत पाहसी बा विघ्नहर्ता ।। मजला बुद्धि दे तू गणनाथा ।। जय देव,।।४।।


श्रीज्ञानदेवाची आरती

आरती ज्ञानराजा। 

महाकैवल्यतेजा।

सेविती साधुसंत। 

मनु वेधला माझा। आरती ॥धृ॥ ।]


लोपले ज्ञान जगी।

हित नेणती कोणी॥

अवतार पांडुरंग।

नाम ठेविले ज्ञानी॥ आरती॥१॥


कनकाचे ताट करी।

उभ्या गोपिका नारी॥

नारद तुंबरही। 

साम गायन करी॥ आरती॥२।


प्रकट गुह्य बोले।

विश्व ब्रह्मचि केलें।

रामा जनार्दनी।

पायी मस्तक ठेविले ॥३॥


आरती ज्ञानराजा । महाकैवल्य॥


तुकारामाची आरती

आरती तुकारामा ।। स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती ।। पाय दाखवीं आम्हां ।।धृ.।। राघवें सागरांत ।। पाषाण तारीले ।। तैसे तुकोबाचे ।।अभंग रक्षिले ।। १।। तुलनेसी।। ब्रह्म तुकासी आलें।। रामेश्वर।। चरणी मस्तक आरती तुकारामा.।।२।।


मारुतीची आरती


सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ।। कडाडिलें ब्रह्मांड धाक त्रिभुवनीं ।

सुरवर नरनिशाचर त्यां झाल्या पळणी ।।१।। जय देव जय देव जय श्रीहनुमंता ।। तुमचेनी प्रसादें न भी कृतांत।।धृ.।। दुमदुमले पाताळें उठिला प्रतिशब्द । थरथरला धरणीधर मानीला खेद।। कडकडिले पर्वत उड़ान उच्छेद । रामी रामदासा

शक्तिचा शोध ।। जय.।।२।।


श्रीशनिदेवाची आरती


जय जय श्री शनिदेवा ।। पद्मकर शिरी ठेवा ।। आरती ओंवाळूं ।। मनोभावे करुनी सेवा ।धृ. । सूर्यसुता शनिमूर्ती।। तुझी अगाध कीर्ती ।। एकमुखी काय वर्णू ।। शेषा न चले स्फूर्ती ।। जय.।। १।। वग्रहांमाजी श्रेष्ठ ।। पराक्रम थोर तुझा ।। ज्यावरी तूं कृपा करिसी ।। होय रंकाचा राजा।। जय.।।२।। विक्रमासारिखा हो ।। शककर्ता पुण्यराशी ।। गर्व धरितां शिक्षा केली ।। बहु छळियेलें त्यासी ।। जय,।।३।। शंकराच्या वरदानें ।। गर्व रावणे केला ।। साडेसाती येतां त्यासी ।। समूळ नाशासी नेला।। जय.॥४ ।। प्रत्यक्ष गुरुनाथा।। चमत्कार दावियेला ।। नेऊन शाळेपाशी ।। पुन्हां सन्मान केला ।। जय.।५ । ऐसे गुण किती गाउं ।। धणी न पुरे गातां ।। कृपा करीं दीनावरी ।। महाराजा समा ।। जय.।।६।। दोनी कर जोडोनियां ।। रक्मा लीन सदा पाई ।। प्रसाद हाचि मागे ।। उदयकाळ सौख्यदायी ।। जय जय श्रीशनिदेवा। पद्मकर शिरी ठेवा.।।७ ।


मंत्रपुष्पांजली


ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवा स्तानि धर्माणि प्रथमान्यासन्। ते ह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः । ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे। स मे कामन् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु। कुवेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ।। ॐ स्वस्ति साम्राज्यं, भौज्यं, स्वाराज्यं, वैराज्यं, पार मोठ्या, राज्यं, माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्याई स्यात् सार्वभौमः सार्वायुष आंतादापरार्धात् । पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो "मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्याऽवसन् गृहे । आविक्षितस्य कामप्रेविश्वेदेवाः सभासद" इति ।। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि । तन्नो दंतिः प्रचोदयात् ।। श्री शुभं भवतु ।


श्री साईबाबांची आरती

आरती साईबाबा ॥ सौख्य दात जीवा !। चरणरजातळीं ॥ द्यावा दासां विसावा ॥ भक्तों ि ॥ आरती ॥धृ॥

जाळुनियां अनंग ॥ स्वस्वी द२ ॥ मुमुक्षु जना दावी ॥ निजडोळा श्रीरंग, डोळां श्रीरंग 1स्तो ॥१ ॥

जया मनी जैसा भाव ।। तया तैसा अनुभव ॥ दाविसी दयाघना॥ ऐसी तुझी ही माव, तुझी ही माव ॥आरती॥२॥ कलयुगी अवतार ॥ सगुण ब्रह्म साचार ॥अवतीर्ण जाहलासे॥ भवभय निवारी ॥ भवभय निवारी ॥आरती॥५॥ टी इच्छित दीन चातक ॥ निर्मळ तोय निजसुख पाजावें माधवा या॥ सांभाळा आपली ही भाक ॥ आपुली ही भाक ॥आरती॥७॥

तुमचें नाम ध्यातां ॥ हरे संसृतिव्यथा ॥ अगाध तव करणी ॥ मार्ग दाविसी अनाथा, दाविसी अनाथा ॥आरती॥३॥

स्वामी दत्त दिगंबर, दत्त दिगंबर ॥आरती॥४॥ आठां दिवसां गुरुवारी ॥ भक्त करिती वारी ॥ प्रभुपद पाहावया ॥

माझा निज द्रव्य ठेवा ॥ तव चरणरजसेवा ॥ मागणे हेंचि आतां ॥ तुम्हें देवाधिदेवा, देवाधिदेवा ॥आरती॥६॥


निरोप गीत

जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा ॥ वारूनिया विघ्ने देवा रक्षावे दीना ॥धृ॥

दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातो ॥ प्रेमे करूनियां देवा गुण तुझे गातो जा.॥१॥ तरी न्यावी सिद्धी देवा हेचि वासना ॥

रक्षुनियां सर्वा द्यावी आम्हांसी आज्ञा Iजा.॥२॥ मागणे ते देवा आता एकची आहे।

तारुनियां सकळां आम्हां कृपादृष्टी पाहे ॥जाओ.॥३॥ जेव्हा सर्व आम्ही मिळू ऐसा या ठाया ॥

प्रेमानंदे लागू तुझी कीर्ति वर्णाया ॥जा॥४ ॥ सदा ऐशी भक्ती राहो आमुच्या मनी ॥

हेचि देवा तुम्हां असे नित्य विनवणी I॥जा॥५॥ निर्दाळुनी अरिष्टा आता आमुची सारी ॥

कृपेची साऊली देवा दीनावरि करी Iजा. ॥६॥ निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी॥

आम्हा सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी Iजा.॥७॥


श्री गणपत्यथर्वशीर्षम् 

श्री गणेशाय नमः (शान्तिमन्त्राः) भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येम क्षभिर्यजना

स्थिरैगस्तुष्वांस्तनूभिव्यशिम देवहितं यदायुः। स्वस्तिनऽइंद्रो वृद्धश्रवः स्वस्द्ि नः विश्ववेदाः। स्वस्तिनस्ताक्ष्योंऽअरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।॥ ॐ शानि : म. सेः शान्तिः॥ ॐ नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि। त्वमेव केवलं १ मेव केवलं धर्तासि। त्वमेव केवलं हर्ताऽसि। त्वमेव सर्व खल्विदं ब्रह्मासि। त्वं सयाबलासि नित्यं॥१॥ ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ॥२॥ अव त्व माम्। अव वक्तारम् । अव श्रोतारम्। अव दातारम् । अव धातारम्। अवानूचानमव शिष्यम्। अव पश्चात्तात्। अव पुरस्तात्। अवोत्तरात्तात्। अव दक्षिणात्तात्। अव चोर्ध्वात्तात्। अवाधराच्ात् सर्वतो मां पाहि पाहि समंतात्॥३॥ त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः। त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः स्वं सचिदानंद द्वितीयोऽसि। त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि। त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि॥४॥ सर्वं जगदिदं त्वत्तो जायते। सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति। सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति। सर्व जगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः॥ त्वं चत्वारि वाक्पदानि॥५॥ त्वं गुणत्रयातीतः। त्वं देहत्रयातीतः। त्वं कालत्रयातीतः। त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम्। त्वं शक्तित्रयात्मकः। त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् । त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वमिंद्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम्।६॥ गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरम्। अनुस्वारः परतर॥ अर्धेन्दुलसितं। तारेण ऋद्धं। एतत्तव मनुस्वरूपम् गकारः पूर्वरूपम्। अकारो मध्यमरूपम्। अनुस्वारश्वांत्यरूपम्। बिंदुरुत्तररूपम्। नादः संधानम्। संहिता संधिः। सैषा गणेश विद्या। गणक ऋषिः। नित गायत्री छन्दः। गणपति देवता। ॐ गॅँ गणपतये नमः॥७।। एकदंताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि। तन्नो दंतिः प्रचोदयात्॥८॥ एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिण। रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम्। रक्तं लंबोदरं शूर्पकर्ण रक्तवाससम्। रक्त गंधानुलिप्तांगं रक्त पुष्पैः सुपूजित। भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम्। आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात्परम्। एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः ॥९॥ नमो व्रातपयते नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदरायैकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय वरदमूर्तये नमः ॥१०॥


एतदथर्वशीर्ष योऽधीते। स ब्रह्मभूयाय कल्पते। स सर्वविघ्नैर्न बाध्यते। स सर्वतः सुखमेधते। स पंचमहापात्प्रमुच्यते। सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति। प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति। सायं प्रातः प्रयुंजानो अपापो भवति। सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति। धर्मार्थकाममोक्षं च विंदति। इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयं। यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति। सहस्रावर्तनात्। यं यं काममधीते तं तमनेन साधयेत्। अनेन गणपतिमभिषिंचति। स वाग्मी भवति। चतुर्थ्यामनश्नन्जपति स विद्यावान् भवति। स वैश्रवणोपमो भवति। यो लाजैर्यजति स यशोवान्भवति। स मेधावान भवति। यो मोदक सहस्रेण यजति स वांछितफलमवाप्नोति। यः साज्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते स सर्व लभते। अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति। सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्त्वा सिद्धमंत्रो भवति। महाविघ्नात्प्रमुच्यते। महादोषात्प्रमुच्यते। महापापात्प्रमुच्यते। स सर्वविद भवति स सर्वविद्भवति। य एवं वेद। इत्युपनिषत्। भद्रंकर्णेभिः ॥०॥ स्वस्ति नः०


सहनाववतु। सह नौ भुनक्तु सहवीर्य करवावहै। तेजस्विनावधीतमस्तु। मा विद्विषावहै। ओम शान्तिः शान्तिः शान्तिः॥ इति श्री गणपत्यथर्वशीर्ष समाप्तम्'


आवर्तन म्हणताना 'ॐ नमस्ते गणपतये' येथपासून 'वरदमूर्तये नमः' येथपर्यंत म्हटले म्हणजे १ आवर्तन झाले. याप्रमाणे इष्ट संख्येइतकी आवर्तने म्हणावी व शेवटी फक्त एक वेळ 'एतदथर्वशी्ष पासून खालील फलश्रुती म्हणावी. (२१ आवर्तनांची १ एकादशनी).


श्री तुकारामाची आरती 


आरती तुकारामा । स्वामी सद्गुरु धामा । सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवी आम्हां । आरती ।। धृ ।।

राघवे सागरांत । पाषाण तारिले । तैसे हे तुकोबाचे । अभंग उदकी रक्षिले । आरती ।।१।।

तुकितां तुलनेसी । ब्रम्ह तुकासि आले ।। म्हणुनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले ।

आरती तुकारामा ।।२।।


पांडुरंगाची आरती


युगे अठ्ठावीस विटेवर उभा।

वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।।

तुळसीमाळा गळा कर ठेवूनि कटी। सुवर्णाची कमळे वनमाळा गळा॥

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा। चरणी वाहे भीमा उद्धरी जगा॥१॥

जय देव जय देव जय पांडुरंगा। रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवल

कासे पीतांबर कस्तुरि लल्लाटी। देव सुरवर नित्य येती भेटी। शिका

गरुड हनुमंत पुढे उभे राहती ॥जय ।।२ ।। धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा। ना समान

राही रखुमाबाई राणीया सकळा। ओवाळीती राजा विठोबा सावळा॥ जय

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती। चंद्रभागेमाजी सोडुनिया देती।

स दिंड्या पताका वैष्णव नाचती। पंढरीचा महिमा वर्णावा किती।।जय ॥४॥


संतमंडळींची आरती

आरती संतमंडळी।

हाती घेऊन पुष्पांजली॥

ओवाळीन पंचप्राणे।

यांचे चरण न्याहाळी ।। आरती॥धृ।।


मच्छिंद्र गोरक्ष गैनी निवृत्तिनाथ।

 ज्ञानदेव नामदेव। खेचर विसोबा संत ॥

सोपान चांगदेव। गोरा जगमित्र भक्त। 

कबीर आणि पाठकनामा। चोखा परसा भागवत॥१॥


भानुदास कृष्णदास। वडवळ सिद्ध नागनाथ । 

बहिरा पिसा मुकुंदराज। केशवस्वामी सूरदास ॥ 

रंगनाथ वामनस्वामी। जनजसवंतदास ॥२॥


एकनाथ रामदास। यांचा हरिपदी वास।

गुरुकृपा संपादली। स्वामी जनार्दन त्यास ॥

मीराबाई मुक्ताबाई । बहिणाबाई उदास ॥

सोनार नरहरी हा। माळी सांवता दास।॥३॥


रोहिदास संताबाई । जनी राजाई गोणाई।।

जोगा परमानंद साल्या । शेखमहमद भाई।। 

निंबराजा भोजराज। माया तयांचे पायी। कूर्मदास शिवदास । मलुकदास कामाबाई॥४॥


नारा महादा गोंदा विठा। प्रेमळ दामाजीपंत ।। तुकोबा गणेशनाथ । सेना नरसी महंत।॥

तुळसीदास कसंबया। पवार संतोबा भक्त। महिपती तुम्हापासी । चरणसेवा मारगत ।। आरती. ॥५॥





0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)