हॉटेलची रचना कशी असावी?

हॉटेलची रचना कशी असावी?

सध्याच्या स्पर्धात्मक जगात हॉटेल व्यवसायाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. हॉटेलच्या आकर्षक व योग्य रचनेचा ग्राहकांच्या मनावर मोठा प्रभाव पडत असल्यामुळे, हॉटेलची रचना वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार केल्यास ते हमखास यशस्वी होते.

१) हॉटेलचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला किंवा ईशान्य कोनात ठेवणे शुभ फलदायी असते.
२) हॉटेलच्या जमिनीचा उतार पूर्व, ईशान्य किंवा उत्तर दिशेला असावा.
३) हॉटेलच्या इमारतीच्या बाहेर दक्षिण किंवा पश्चिम दिशेला उंच डेरेदार झाडे लावली पाहिजेत.
४) हॉटेलच्या स्वयंपाकघरात इंधन म्हणून लाकूडफाटयाचा वापर होणार असेल, तर असा लाकूडेफाटा दक्षिण दिशेला ठेवावा.
५) हॉटेलच्या पूर्व दिशेपेक्षा पश्चिम दिशेचा आणि उत्तर दिशेपेक्षा दक्षिण दिशेचा भाग अधिक उंच असला पाहिजे.
६) स्विमिंग पूल, तळाव, कारंजी इ. हॉटेलच्या उत्तर-पूर्व किंवा ईशान्य कोनात बांधावीत.



0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)