शनीचा व वास्तूचा संबंध



एखाद्या व्यक्तीच्या. जन्म कुंडलीत शनी कोणत्याही स्थानी असेल व तेंव्हा त्या व्यक्तीने नवीन घर बांधण्यास सुरुआत केली तर त्या त्या स्थानातील शनी त्या व्यक्तीला तीन ते अठरा वर्षात शुभ-अशुभ फल देतो. त्याविषयी वास्तू व शनीचा सबंध व उपाययोजना पुढीलप्रमाणे


१) वास्तू बांधताना त्या व्यक्तीच्या कुंडलीत पहिल्या (लग्न) स्थानात शनी असेल तर सातवे व दहावे स्थान रिकामे असेल तर नी वास्तुसौख्य देतो.
२) दुसऱ्या स्थानात शनी असेल तर वास्तू बांधत असता बांधकाम मध्येच थांबेल, असे करु नये. जशी जमेल तशी वास्तू बांधून घ्यावी. असे केल्यास हा शनी शुभ फल देतो.
३) तिसऱ्या स्थानात शनी असेल तर घर बांधून झाल्यानंतर त्या व्यक्तीने घरात तीन कुत्र्यांना पाळावे. त्यामुळे शनीची फळे शुभ मिळतात.
४) जर जन्मकुंडलीत चौथ्या स्थानात शनी असेल तर त्या व्यक्ती स्वतःचे घर बांधू नयेः शनीपालट होईपर्यंत भाड्याच्या घरात राहावे, कारण घर बांधलेच तर आई, आजी, सासू व मामा या चारही जणांना त्रास होण्याची            शक्यता असते.
५) पाचव्या स्थानात शनी असल्यास एखाद्या व्यक्तीने घर बांधायला घेतले तर त्याच्या मुलाला त्रास होतो. परंतु मुलाकडून नवीन वास्तू बांधून घेण्यास काही हरकत नाही. जर घर बांधायचेच असेल तर सा व्यक्तीने वयाच्या
४ ८व्या वर्षानंतर घर बांधावे. परंतु घर बांधतांना पाया खोदण्यापूर्वी शनीचे वाहन रेडा त्याचे पूजन करावे.
६) सहाव्या स्थानात शनी असेल तर त्या व्यक्तीने वयाच्या ३६ अथवा ३९व्या वर्षी नवीन घर बांधावे. तत्पूर्वी घर  बांधले तर त्याच्या मुलीला सासरी त्रास होतो.
७) कुंडलीत सातव्या स्थानात शनी असेल तर त्या व्यक्तीला वास्तुसुख चांगले मिळते. बनविलेले चांगले घरही सहज  मिळते.. परंतु याच स्थानात शनी अशुभ असल्यास घर विकावे लागते.
८) आठव्या स्थानात शनी असेल तर नवीन घर बांधताना अगदी सुरुवात करण्यापासून ते घर पूर्ण होईपर्यंत अनेक अडचणी व अडथळे निर्माण होतात. परंतु याच स्थानात राहू व केतू शैभ असतील तर मात्र वास्तूविषयक शुभ फळे मिळतात.
९) नवव्या स्थानात शनी असेल तर त्या व्यक्तीने घर तेंव्हाच बांधण्यास सुरुवात करावी की जेव्हा त्याची माता वा त्याची पत्नी गर्भवती असेल, तसेच स्वत:चे धन व त्यात थोड वडिलांचे धन असे एकत्र करुनच घर बांधावे.
१०) दहाव्या स्थानात शनी असल्यास नविन घर बांधण्यास सुरुवात करु नये, कारण यावेळी घर बांधल्यास कोणतेही लाभ होत नाही. कदाचित घरही अर्धवट स्थितीत राहते. बांधकाम पूर्ण होत नाही.
११) अकराव्या स्थानात शनी असेल तर त्या व्यक्तीला वास्तु सौख्य उशिरा मिळते. वयाच्या ५५ वर्षानंतर घर बांधण्याचा योग येतो. फक्त घराचे मुख्य दरवाजे दक्षिणेला येणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसे न केल्यास घरात दीर्घमुदतीचे आजार होतात.
१२) बाराव्या स्थानात शनी असेल तर त्या व्यक्तीने शक्यतो चौरसाकृती घर बांधावे. कारण तेच घर त्याला विशेष लाभदायक असते. तसेच फारसे कष्ट न पडता घर बांधून होते.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)