शास्त्रशुद्ध वास्तुशांती अशी करावी ?


 

१) आग्नेय, नैऋत्य किंवा ईशान्य या पवित्र दिशा पैकी एका दिशेला वास्तुप्रतिमेची स्थापना करावी ती जागा पायदळी तुडवली जाऊ नये वा अपवित्र स्थळी असू नये.

२) वास्तुदेवतेची प्रतिमा सोन्याच्या जाड पत्र्याची असावी.

३) वास्तूची मालकी एखाद्या विधवा स्त्रिकडे असेल, तर तिने पुरोहितांच्या मदतीने वास्तुशांती करावी, पुरोहितांनी तिला देवतांची पंचोपचारपूजा, द्रव्यत्याग व वराहुती इ. शक्य त्या विधींमध्ये तिला अगत्यपूर्वक सहभाग द्यावा.

४) वास्तुशांतीच्या दिवशीच सत्यनारायणाची पूजा ठेवू नये. कारण त्यामुळे वास्तुशांतीला दुय्यम महत्व येते.

५) स्वत:च्या फ्लॅटची वास्तुशांती करताना सूत्रबंधन, आठ दिशांना द्रोणांतून दहीभात ठेवणे, जमिनीत खिळे ठोकणे व घराभोवती दूधपाण्याच्या धारा धरणे या गोष्टी वर्ज्य केल्या तरी चालतील.

६) घर बांधल्यावर वास्तुशांती करुन मगच गृहप्रवेश करता येतो, ही संकल्पना चुकीची आहे. नवीन घरात दिनशुद्धी पाहून गृहप्रवेश केल्यावर वास्तुशांती सवडीने केली तरी चालते.

७) एकाच मालकाचे सलग दोन फ्लॅट असून, त्यांच्यात अंतर्गत दरवाजा असेल, तर दोन्हींची मिळून एक वास्तुशांती येते. तसा दरवाजा नसेल किंवा दरवाजा असूनही भित्न मालकांकडे दोन्ही फ्लॅटची मालकी असेल, तर प्रत्येक फ्लॅटची स्वतंत्रपणे वास्तुशांती करावी. करत

८) फ्लॅटची वास्तुशांती करताना सूत्रवेष्टन व गृहप्रदक्षीण करण्याची आवश्यकता नसते. 

९) उदकशांती हा वास्तुशांतीचा पर्याय होऊ शकत नाही, कारण दोन्हींची उद्दिष्टये वेगवेगळी आहेत.

१०) अतिशय प्रसन्न व उत्साही वातावरणात वास्तुशांतीचा विधी पार पाडावा.घरात देव्हारा कोणत्या दिशेला असावा घरात देव्हारा कोणत्या दिशेला असावा, हे सांगण्या पूर्वी त्याहीपेक्षा महत्वाची आणखी एक गोष्ट. केवळ उपचार म्हणून किंवा घराची शोभा वाढविण्यासाठी, श्रीमंतीचे, धार्मिकतेचे प्रदर्शन करण्याच्या हेतूने देव्हाऱ्याची स्थापना कधीही करु नये.  

अत्यंत भक्तीभावाने, पवित्र तन-मनाने व पैसा संपत्तीच्या स्वार्थी विचारांना थोडा वेळ फाटा देऊन उत्साही मनाने देव्हाऱ्याची स्थापना करावी. पहाटे उठून प्रातर्विधी, अंघोळ करावी घरातील ईशान्य वा पूर्व बाजूची जागा देव्हाऱ्यासाठी निवडावी. 

ती स्वच्छ पुसून घ्यावी. पूजा करताना पूर्वेला तोंड होईल, अशा पद्धतीने देव्हाऱ्याची स्थापना करावी. देव्हारा व देव्हाऱ्यात देवांची स्थापना केल्यानंतर देवाला फुले वाहावीत. नैवद्य ठेवावा. धूप जाळून सुवासिक अगरबत्ती लावावी. 

शौचालय, अडगळीची खोली वा पादत्राणे ठेवण्याच्या ठिकाणाजवळ देवघर नसावे, याची कटाक्षाने काळजी घ्यावी. देवघरात फुटका फोटो व फुटकी मुर्ती ठेवू नये. 

सर्वात महत्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे, एखादा नवस बोलून वा एखादे रखडलेले काम पूर्ण होण्याची इच्छा मनात ठेवून देव्हाऱ्याची स्थापना वा पूजा करु नये. सर्वाना सुखात ठेव व त्याचबरोबर मलाही माझ्या जीवनाची योग्य वाट दाखव कारण, हे देवा तू सर्वज्ञ आहेस, अशी प्रार्थना सर्वात उत्तम!

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)